घरात एक कार असावी, कुटुंबाला घेऊन आपण लॉंग ड्राइव्हला जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते.
पण अनेकदा कारच्या वाढत्या किंमती आणि बजेट याचा ताळमेळ न बसल्याने स्वप्न अपूर्णच राहतं.
आपण 4 लाखांच्या आत मिळणाऱ्या कार्सची यादी जाणून घेऊया. यात एक कार अशीदेखील आहे, जी 34 किमी एवरेज देते.
मारुती वॅगनार 1.0 आणि 1.2 लीटर अशा 2 पर्यायांमध्ये येते. याचे पेट्रोल व्हेरिएंट 24.35 किमी/लीटर आणि सीएनजी व्हेरिएंट 34.05 किमी/किग्र पर्यंत मायलेज देते. याची किंमत 5.54 लाख रुपये आहे.
मारुती सेलेरियोमध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन येतं. याचे पेट्रोल व्हेरिएंट 26.68 किमी/लीटर आणि सीएनजी व्हेरिएंट 34.43 किग्रॅ पर्यंत मायलेज देते. या गाडीची किंमत 5.37 लाख रुपये आहे.
मारुती प्रेसोमध्येदेखील 1.0 लीटर पेट्रोल इंजिन येतं. याचं पेट्रोल व्हेरिएंट 25.30 किमी/लीटर आणि सीएनजी व्हेरिएंट32.73 किमी/किग्रॅ पर्यंत मायलेज मिळतं.
रेनो क्वीडमध्येदेखील 1.0 लीटर पेट्रोल इंजिन येतं. यामध्ये सीएनजी व्हेरिएंटचा पर्याय येत नाही. ही कार साधारण 20 ते 21 किमी/लीटर मायलेज देते.
देशातील सर्वात स्वस्त कार ऑल्टो 10 मध्येदेखील 1.0 लीटर पेट्रोल इंजिन येतं. याचे पेट्रोल व्हेरिएंट 24.39 किमी/ लीटर आणि सीएनजी व्हेरिएंट 33 किमी/किग्रॅ पर्यंत मायलेज देते.