मोबाईलमधील बॅलेन्स टाकताना म्हणजेच मोबाईल रिचार्ज करताना सामान्यपणे 28 दिवसांचं रिचार्ज पॅक मिळतं.
मात्र महिना 30 किंवा 31 दिवसांचा असताना मोबाईल रिचार्ज 28 दिवसांची व्हॅलिडीटी असलेलं का मिळतं? याचा कधी तुम्ही विचार केलाय का? याचं आर्थिक गणित काय आहे?
खरं तर 30 किंवा 31 दिवसांची व्हॅलिडीटी देण्याऐवजी 28 दिवसांचा रिचार्ज दिल्याने कंपन्यांना मोठा आर्थिक फायदा होतो.
28 दिवसांच्या रिचार्ज सायकलमध्ये ग्राहक एका महिन्याचं अधिक रिचार्ज करावं लागतं. ही टेलिकॉम कंपन्यांची ट्रीक असते. कसं ते पाहूयात...
28 दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दोन महिन्यात 56 दिवासांचं रिचार्ज मिळतं.
कंपन्या दर महिन्याच्या रिचार्ज प्लॅनमधून दोन किंवा तीन दिवस कमी करते. त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर पडतो.
वर्षात 12 महिने असतात त्या हिशोबाने 12 वेळा रिचार्ज केलं पाहिजे. मात्र दर महिन्याचे दोन ते 3 दिवस प्लॅनमध्येच कमी मिळत असल्याने वर्षातून 13 वेळा रिचार्ज करावं लागतं.
कंपन्या दर महिन्याला 28 दिवसांचं रिचार्ज विकून 2 किंवा 3 दिवस बाजूला काढून काढून एक अख्खा अतिरिक्त महिना 12 महिन्यांच्या सायकलमधून बाहेर काढते.
कंपन्यांच्या याच चालाखीमुळे ग्राहकांना 12 महिन्यामध्ये इच्छा नसतानाही 13 वेळा रिचार्ज करावं लागतं.