लोनची चिंता मिटणार, खर्चही वाचणार; पाहा 10 लाखांच्या आतील Diesel Cars
या कारचे मॉडेल खिशाला परवडतील अशा दरात उपलब्ध असल्यामुळं अनेकांचच त्यांना प्राधान्य.
एखादी कार खरेदी करायची झाल्यास सध्या अनेकांनाच 5 ते 10 लाख रुपयांचा खर्च परवडतो. यामध्ये अर्थातच लोनची व्यवस्थाही आलीच.
डिझेल कार्सच्या बाबतीत तुम्हीही अशा एखाद्या मॉडेलच्या शोधात असाल, तर काही उत्तम पर्याय तुम्ही Shortlist करू शकता.
पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन व्हेरिएंटमध्ये येणारी ही कार एक प्रिमीयम हॅचबॅक मॉडेल आहे.
1.5-लीटर टर्बोचार्ज्ड डीझेल इंजिन असणारी ही कार भारतातील सर्वास स्वस्त डिझेल कार असून तिची किंमत 8.15 लाख रुपयांपासून सुरु होते.
महिंद्रा बोलेरो किंवा बोलेरो नियो ही एक लोकप्रिय एसयुवी आहे. 9.62 लाख रुपयांपासून या कारची Price Range सुरु होते. या दोन्ही कारमध्ये 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड डीझेल इंजिन मिळतं.
सब4 मीटर एसयूव्ही असणारी महिंद्रा एक्सयूवी300 ही 1.5 लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनसह येते. यामध्ये 6 मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6 स्पीड एएमटीचे पर्याय मिळतात. 9.90 लाखांपासून या कारची किंमत सुरु होते.
फार कमी वेळात प्रसिद्ध झालेली किया सोनेट कमाल आहे. यामध्ये 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळतं. 9.95 लाख रुपयांपासून ही कार उबलब्ध आहे.
9.99 लाखांपासून सुरु होणारी टाटा नेक्सन 1.5 लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन कार आहे. यामध्ये पेट्रोल इंजिनचाही पर्याय आहे.