आता गाडीच्या नंबर प्लेट्सवरुनच कळेल माहिती

आता पुढच्या वेळेस रस्त्यावर वेगवेगळ्या रंगाच्या नंबर प्लेट पहिल्यावर तुम्हाला त्यावरुन गाडीसंदर्भातील बरीच माहिती समजेल. होय की नाही? (फोटो - रॉयटर्स, पीटीआय, क्वोरा, आरसीव्हीजे, सोशल मीडियावरुन)

विशेष नंबर प्लेट

लाल रंगाची नंबर प्लेट ज्यावर भारताची राजमुद्रा असते ती केवळ राष्ट्रपतींच्या आणि त्यांचं राज्यात प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्यपालांच्या गाडीसाठी वापरल्या जातात.

वर बाण असलेली नंबर प्लेट

वरच्या दिशेला बाण असणारी नंबर प्लेट ही लष्करी वाहनांसाठी वापरली जाते.

निळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स काय दर्शवतात?

निळ्या नंबर प्लेट्स या परदेशी राजदूत किंवा मोठ्या परदेशी संस्थांशी संबंधित व्यक्तींच्या प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांवर दिसून येतात. या गाड्यांचे नंबरही विशेष असतात. प्रत्येक देशाचा वेगळा कोड या क्रमांकात असतो.

लाल रंगाच्या नंबर प्लेट काय दर्शवतात

लाल रंगाच्या नंबर प्लेट्स या गाड्या विकत घेतल्यानंतर कायमचा क्रमांक येण्याआधी तात्पुरता क्रमांक देतात त्यासाठी वापरल्या जातात. या नंबर प्लेट्सची व्हॅलिडीटी सामान्यपणे एका महिन्याची असते. (फोटो - आरसीव्हीजे)

काळ्या नंबर प्लेट्सचा अर्थ काय?

काळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स या लक्झरी हॉटेल्सच्या गाड्यांसाठी वापरल्या जातात. या गाड्या मोठ्या शहरांमध्ये जास्त संख्येनं दिसतात. (फोटो - आरसीव्हीजे)

हिरव्या नंबर प्लेट्सही अनेकदा दिसतात पण त्यांचा अर्थ काय?

हिरव्या नंबर प्लेट्स या इलेक्ट्रीक गाड्यांना वापरल्या जातात. अगदी इलेक्ट्रीक बसच्या नंबर प्लेट्सही हिरव्याच रंगाच्या असतात.

पिवळा रंग काय दर्शवतो

पिवळ्या नंबर प्लेट्स या भाड्याने वापरल्या जाणाऱ्या गाड्यांसाठी असतात. या गाड्या चालवण्यासाठी कमर्शिएल चालकाचा परवाना आवश्यक असतो.

पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट

पांढरी नंबर प्लेट ही सर्वसामान्य खासगी वाहनांसाठी वापरली जाते. या नंबर प्लेटवर काळ्या रंगाची अक्षरं वापरली जातात.

समजून घ्या अर्थ

सामान्यपणे हिरव्या, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स तुम्ही पहिल्या असतील. पण या नंबर प्लेट्सचा रंग गाडीसंदर्भातील माहिती सांगत असतो हे तुम्हाला ठाऊक आहे का? नंबर प्लेट्सचे रंग नेमकं काय सांगतात आणि त्यांचा अर्थ काय असतो पाहूयात...

मात्र या वेगवेगळ्या रंगांना काय अर्थ असतो?

मात्र हे रंग नेमके का दिले जातात? त्या रंगांचा अर्थ काय असतो हे तुम्हाला माहिती आहे का?

वेगवेगळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स

अनेकदा प्रवासादरम्यान तुम्ही गाड्यांच्या नंबर प्लेट्सकडे पाहिलं तर त्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात असं दिसून येतं.

गाड्यांवरील वेगवेगळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स काय दर्शवतात?

तुम्ही सुद्धा अनेकदा वेगवेगळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स पाहिल्या असतील. पण यांचा अर्थ तुम्हाला माहितीये का?

VIEW ALL

Read Next Story