जगातील प्रख्यात कंपनीचे, प्रसिद्ध ब्रँडचे इयरबड्स कानातच फुटल्यामुळं ते वापरणाऱ्या व्यक्तीला बहिरेपण आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
तुर्कीतील एका व्यक्तीनं केलेल्या दाव्यानुसार त्याची प्रेयसी इयरबड्सचा वापर करत असतानाच त्यांचा स्फोट झाला आणि तिची ऐकण्याची क्षमताच नाहीशी झाली.
प्रतिष्ठीत कंपनीच्या तुर्की कम्युनिटी फोरममध्ये ही माहिती शेअर करण्यात आली.
उपलब्ध माहितीनुसार युजरनं इयरबड्स एकदाची चार्ज केले नव्हते, कारण ते खरेदी केले तेव्हाच 36 टक्के चार्ज होते.
सदर घटनेनंतर ज्यावेळी सर्व्हिस सेंटरपर्यंत हा प्रकार पोहोचला तेव्हा कंपनीच्या वतीनं ग्राहकांची माफी मागण्यात आली.
दरम्यान कंपनीकडून मात्र काही दिवसांतच इयरबड्स फुटले नसून, त्यांचा आकार बदलला असल्याचा दावा करण्यात आला. असं असलं तरीही आता इयरबड्स वापरतानाही सावधगिरी बाळगण्याचाच सल्ला दिला जात आहे.