महिना 10 लाख रुपये कमवतो 'हा' Youtuber! 9 महिने होता तुरुंगात

काही आठवड्यांपूर्वी तुरुंगातून बाहेर

बिहारमधील चर्चेतील युट्यूबर मनीष कश्यप हा काही आठवड्यांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला.

चुकीची माहिती दिल्याचा आरोप

युट्यूबवर मनीषने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवत त्याला तुरुंगात टाकण्यात आलेलं.

या कारणामुळे गेलेले तुरुंगात

मनीषने तामिळनाडूमध्ये बिहारमधील कामगारांबरोबर भेदभाव झाल्याचा आरोप केला होता. याच चुकीचे दावे करणाऱ्या व्हिडीओमुळे त्याला तुरुंगवास झाला.

9 महिन्यांनंतर तुरुंगामधून बाहेर

तब्बल 9 महिन्यांनंतर मनीष तुरुंगामधून बाहेर पडला. त्याला बेउरच्या तुरुंगातून मुक्त करण्यात आलं.

बिहारमध्ये कंसाचं सरकार

मला कारण नसताना फसवण्यात आलं. बिहारमध्ये कंसाचं सरकार आहे, अशी टीका मनीषने तुरुंगातून बाहेर पडल्यावर केली.

तुरुंगाबाहेर जल्लोषात स्वागत

मनीष तुरुंगाबाहेर येण्याआधी मोठ्या संख्येनं त्याचे समर्थक तुरुंगाबाहेर जमा झाले होते. फुलांचे हार घालून चाहत्यांनी मनीषचं स्वागत केलं.

किती कमवतो?

युट्यूबवरुन किती पैसे कमवतो याबद्दल विचारण्यात आलं असता मनीषने या प्रश्नाचं थेट आकड्यासहीत उत्तर दिलं.

महिन्याला 10 लाख कमवतो

मी युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कंपनीच्या नावाने दर महिन्याला 10 लाख रुपये कमवतो, असं मनीष म्हणाला.

खात्यात 40 लाख रुपये होते

माझ्या खात्यात 40 लाख रुपये होते तरी ते सील करण्यात आल्याचा दावा मनीषने केला. या कारवाईवरुन त्याने राज्य सरकारवर निशाणा साधला.

किती आयकर भरला हे ही सांगितलं.

मी 5 लाख रुपये आयकर भरला आहे तर माझ्या जोडीदाराने साडेचार लाख रुपयांचा आयकर भरल्याचं मनीषने म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story