प्लीज लक्षात घ्या की चांगल्या ऑफरसह येणाऱ्या निवडक उत्पादनांवर हे नाममात्र शुल्क आहे. हे शुल्क केवळ सेलदरम्यान तुमच्या पहिल्या ऑर्डरवर लागू होते, असे कंपनीने म्हटलं आहे. (फोटो - Reuters)
एका युजरने ट्विट करत विक्री शुल्क म्हणून 10 रुपये आणि शिपींग चार्ज म्हणून 40 रुपये भरल्यानंतरही मला तुटलेली वस्तू मिळाली आहे, असे म्हटलं आहे.
युजर्सनी असा आरोप केला की फ्लिपकार्टने विक्रीचा भाग नसलेल्या उत्पादनांवरही विक्री शुल्क आकारले आहे. इतरांनीही फ्लिपकार्टवर आरोप केले आहेत.
फ्लिपकार्ट सेल दरम्यान वस्तू खरेदी करणाऱ्या युजर्सकडून 10 रुपये आकारत आहे. यासोबत 10 रुपयांचे वन टाईम पेमेंट तुम्हाला टॉप डील देईल असाही मेसेज येत आहे
फ्लिपकार्टने पॅकेजिंग शुल्क वाढवल्यानंतर आता ग्राहकांकडून 99 रुपये आकारले जात आहेत. या वस्तूंच्या सुरक्षित वितरणासाठी हे पाऊल उचलण्यात आले असे फ्लिपकार्टने म्हटलं होतं.
फ्लिपकार्टवर काही दिवसांपूर्वी बिग सेव्हिंग्ज डे सेल सुरु होता. कंपनीने सेलच्या वस्तूंवर 10 रुपये विक्री शुल्क आकारत होती. फ्लिपकार्टचे हे पाऊल ग्राहकांना पसंत पडलेले नाही.
(फोटो सौजन्य - Reuters)