बाईकप्रेमींसाठी आश्चर्य आणि आकर्षणाचा विषय असणारी रॉयल एनफिल्डची बुलेट बाईक फक्त भारतातच नव्हे तर, परदेशातही तितकीच लोकप्रिय आहे.
जगातील सर्वात जुनी आणि आजही कार्यरत असणारी मोटरसायकल उत्पादक कंपनी अशी एनफिल्डची ओळख.
रॉयल एनफिल्डची सुरुवात एक ब्रिटीश परदेशी कंपनी म्हणून झाली होती. 1994 मध्ये आयशर मोटर ग्रुपनं एनफिल्ड ही कंपनी खरेदी केली.
या कंपनीच्या बाईकचे सर्व मॉडेल भारतात तयार करून त्यानंतर ते जगभरात विक्रीसाठी पाठवण्यात येतात.
रॉयल एनफिल्ड बाईकचं डिझाईन त्याच्या रॉयल लूकमुळं चर्चेत असून तरुणांमध्ये कमालीचा लोकप्रिय आहे.
इंजिनमध्ये कमालीची ताकद या बाईकला मोठ्या आणि महामार्गांवरील प्रवासासाठी योग्य ठरवते.
थोडक्यात रॉयल एनफिल्ड ही कंपनी परदेशी आहे, पण तिच्या बाईक मात्र भारतातच तयार होतात.