अनेक कामांसाठी जेसीबी बुल्डोझरचा वापर केला जातो. पण, त्याचा रंग कायम पिवळाच का असतो?
खड्डा खोदणं असो, मातीचा उपसा करणं असो किंवा आणखी काही काम... जेसीबी अतिशय मदतीचा ठरतो.
अनेकदा अंधारातही जेसीबीची कामं सुरूच असतात आणि कमी प्रकाशातही तो ठळकपणे दिसावा याच कारणास्तव तो कायम पिवळ्या रंगाचा असतो.
आधी JCB पांढऱ्या रंगाचा असायचा. पण दुरून तो स्पष्टपणे दिसत नसे. त्यामुळं काम सुरू असल्याच्या चिन्हासाठी त्याला आणि बहुतांश क्रेनना पिवळा रंग दिला गेला.
1964 पासून जेसीबीला पिवळा रंग देण्यास सुरुवात झाली.
पिवळा रंग इतर रंगांच्या तुलनेत दुरूनही अधिक स्पष्टपणे दिसतो. त्यामुळं तो पिवळ्याच रंगात असतो.