Google च्या या फिचरचा फायदा तुम्हाआम्हा सर्वांनाच होणार आहे, कारण अधिकृत सेंडर तुम्हाला सहजपणे ओळखता येणार आहे. त्यामुळं तुम्हाला असा एखादा मेल आला आणि तिथं ब्ल्यू टीक असेल तर तो अधिकृत ब्रँडकडून आला आहे हे लक्षात घ्या.
थोडक्यात आता तुम्हाला एखाद्या ब्रँडपुढे अशी ब्ल्यू टीक दिसली, तर समजा की या ब्रँडनं BIMI फिचर अक्टिव्ह ठेवलं आहे.
BIMI हे जीमेलचं फिचर 2021 मध्येच वापरात आणलं गेलं आहे. जिथं ब्रँड लोगो शो करण्यासाठई स्ट्राँग वेरिफिकेशनची गरज भासते.
हे चिन्हं आपोआपच अशा कंपन्यांच्या नावापुढे दिसू लागलं आहे ज्यांनी सध्या ब्रँड इंडिकेटर फॉर मॅसेज आयडेंटिकेशनचं (BIMI) फिचर स्वीकारलं आहे.
ओळखीची पडताळणी करण्यासाठी गुगलकडून काही निवडक अकाऊंट होल्डर्च्या नावापुढं हे चेकमार्क देण्यात आलं आहे.
तुम्ही लगेचच जाऊन जीमेलचे अपडेट्स पाहताय का? हे फिचर ठराविक युजर्सनाच देण्यात येत आहे.
घ्या... आता Gmail ही देतंय Blue Tick; तुम्हाला कसा होईल फायदा?