गुगलने हा निर्णय घेतला आहे

May 26,2023

कोणते फिचर होणार बंद?

युट्यूबची मालकी असलेल्या गुगलने यूट्यूब स्टोरीज पर्याय हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

कधीपासून होणार बंद?

यूट्यूब स्टोरीजचा पर्याय क्रिएटर्सना 26 जूनपासून उपलब्ध होणार नाही. 26 जूनपासून कोणत्याही YouTube क्रिएटरला स्टोरीजचा पर्याय मिळणार नाही

कधी आले होते हे फिचर?

YouTube ने 2017 मध्ये YouTube Stories हे फिचर आणले होते. याद्वारे क्रिएटर्स त्यांच्या मोठ्या व्हिडिओंची जाहिरात करु शकत होते.

कशासाठी घेतला हा निर्णय?

कंपनीला YouTube शॉर्ट्स, लाइव्ह इत्यादीसारख्या इतर व्हिडिओ फिचर्सवर लक्ष केंद्रित करायचे आहे. या मुख्य वैशिष्ट्यांना प्राधान्य देण्यासाठी यूट्यूबने स्टोरीजला रामराम करत असल्याचे म्हटलं आहे.

कोणासाठी होते हे फिचर?

YouTube स्टोरीज फीचर हे यूट्यूबचे प्रोडक्ट नव्हते. स्नॅपचॅटपासून प्रेरणा घेऊन ते तयार केले गेले होते. हे फिचर ठीकठाक सब्‍सक्राइबर्स मिळवलेल्या युजर्ससाठी होते.

आता शॉर्ट्स व्हिडिओतूनही मिळणार क्रिएटर्सना पैसे

या वर्षाच्या सुरुवातीला, YouTube ने सांगितले होते की ते शॉर्ट्स व्हिडिओ बनवणाऱ्या क्रिएटर्ससह जाहिरातीतून मिळणारी रक्कम वाटण्यास सुरुवात करणार आहे.

किती पैसे मिळणार?

शॉर्ट्स व्हिडिओतून YouTube 55 टक्के कमाई घेईल आणि 45 टक्के क्रिएटर्सकडे जाईल. 1 फेब्रुवारीपासून हा नियम लागू झाला आहे. 10 जुलैपर्यंत क्रिएटर्स यासाठी नोंदणी करु शकतात.

VIEW ALL

Read Next Story