आयफोनला टक्कर देणारा Google pixel 8 तब्बल 14000 नी स्वस्त; नका पाहू दुसरे पर्याय

Jul 18,2024

फ्लिपकार्ट

फ्लिपकार्टच्या G.O.A.T या सेलमध्ये दमदार ऑफर आणि सवलतींची खैरात असणार आहे.

सवलत

19 ते 23 जुलै दरम्यानच्या कालावधीत ही सवलत लागू असेल. यामध्ये सर्वात कमाल डील आहे ती म्हणजे Google pixel 8 ची.

गुगल पिक्सल 8

फ्लिपकार्टच्या या मेगासेलमध्ये गुगल पिक्सल 8 आता 61999 रुपयांना मिळत नसून, त्यासाठी अवघे 47999 रुपये मोजावे लागत आहेत. या फोनवर तब्बल 14 हजार रुपयांची सवलत मिळत आहे.

फोनची किंमत

128 जीबी हेजल मॉडेलच्या या फोनची किंमत सर्व ऑफर लागू केल्यास 14 हजारांनी कमी होत आहे. त्यामुलं 6.2 इंचांचा डिस्प्ले असणाऱ्या या फोननं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

प्रोसेसर

गुगल टेन्सर जी3 प्रोसेसर असणाऱ्या या फोनमध्ये Titan M2 सिक्योरिटी प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 7 वर्षांसाठी सिक्युरिटी आणि ऑपरेटिंग सिस्टीमचे अपडेट मिळणार आहेत.

प्रोटेक्शन

अँटी स्कॅम आणि अँटी फिशिंग प्रोटेक्शनही या फोनमध्ये देण्यात आलं आहे. ड्युअल कॅमेरा सेटअप असणाऱ्या या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 एमपी ओक्टा पीडी वाईड कॅमेरा आहे. तर सेकंडरी कॅमेरा 12 एमपीपर्यंतची दृश्य टीपतो.

चार्जिंग

4575 mAh बॅटरी असणाऱ्या या फोनचं चार्जिंग 24 तासांपर्यंत टिकतं असा दावा कंपनी करते. शिवाय फास्ट चार्जिंग सपोर्ट असल्यामुळं हा फोन फायद्याचा ठरतो.

VIEW ALL

Read Next Story