गुगल पिक्सल 9 आणि पिक्सल 9 प्रो एक्सएलची भारतात एन्ट्री झाली आहे.
या सिरिजमध्ये कंपनीने Google Pixel 9, गुगल पिक्सल 9 Pro आणि पिक्सल 9 प्रो एक्सएल स्मार्टफोन लॉन्च केले.
गुगल पिक्सल सिरीजमधील हे फोन थेट आयफोनशी स्पर्धा करतात.
फ्लिपकार्टवर सिरिजच्या दोन स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. सेल दरम्यान तुम्हाला ICICI बँक कार्डद्वारे अतिरिक्त डिस्काउंट ऑफर मिळत आहे.
या सेलमध्ये तुम्ही फोन स्वस्तात खरेदी करू शकाल. फोनची किंमत, ऑफर आणि विक्री संबंधित तपशील येथे जाणून घ्या.
गुगल पिक्सल 9 आणि पिक्सल 9 प्रो एक्स एल स्मार्टफोनची विक्री आज फ्लिपकार्टवर थेट झाली आहे.
पिक्सल 9 सेल दरम्यान, ICICI बँक कार्डद्वारे फोनवर 4000 रुपयांपर्यंतची सूट ऑफर दिली जात आहे. त्याच वेळी, प्रो XL मॉडेलवर 10,000 रुपयांची सूट मिळतेय.
गुगल पिक्सल 9 फोन 79 हजार 999 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता.
ज्यावर 4000 रुपयांचा डिस्काऊंट मिळतोय. तुम्हाल 75 हजरा 999 रुपयांना खरेदी करता येईल.
गुगल पिक्सल 9 प्रो एक्स एलवर 10 हजार रुपयांची सूट ऑफरमध्ये मिळतेय. त्याची मूळ किंमत 1 लाख 24 हजार 999 रुपये आहे.
तुम्ही हा फोन 1 लाख 14 हजार 999 रुपयांना खरेदी करु शकता.