युजर्ससाठी सरकारकडून अलर्ट, एका मिनिटांत बँक खाते होऊ शकते रिकामे

भारत सरकारची सायबर डिफेंन्स एजन्सी कंप्युटर इमरजेन्सी रिस्पोन्स टीमकडून मोबाइल युजर्ससाठी एक अलर्ट जारी करण्यात आली आहे. बँक अकाउंटसंदर्भात एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

एजन्सीने काही धोकादायक वल्नरबिलिटीबाबत सांगितले आहे. अँड्रोइड ऑपरेटिंग सिस्टमसाठी अति धोकादायक ठरु शकते.

CERT-In एक नोडल एजेंन्सी आहे. जी मिनिस्टी ऑफ इलेक्ट्रोनिक्स अँड इन्फोर्मेशन टेक्नोलॉजीअंतर्गंत काम करते. त्याचबरोबर वेळोवेळी इंटरनेट संबंधित सेफ्टी अॅडव्हायजरीदेखील जारी करते.

CERT-In ने अलीकडेच एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, अँड्रोइड मोबाइल ऑपरेटिंग मोबाइल सिस्टममध्ये वल्नरबिलिटी आढळले गेले आहेत. ज्यामुळं हॅकर्सना तुमच्या मोबाइलचा सहज अॅक्सेस मिळू शकतो.

हॅकर्स तुमचा मोबाइलचा अॅक्सस करु शकतात त्याचबरोबर त्यातील डेटादेखील चोरू शकतात.

CERT-In नुसार, अँड्रोइड ११, १२ आणि १३ वर काम करणारे डिव्हाइसला याचा सर्वात जास्त धोका निर्माण होऊ शकतो.

या स्थितीतून बचाव करण्यासाठी तुमच्या अँड्रोइड फोनला अपडेट करणे गरजेचे आहे. गुगलकडून अनेक सिक्युरिटी पर्याय देण्यात येतात जे युजर्सना सुरक्षित ठेवते.

मोबाइलच्या ऑपरेटिंग सिस्टमला अपडेट ठेवण्यासाठी युजर्सना एक प्रोसेस फॉलो करावी लागते. सेटिंगमध्ये गेल्यानंतर अबाउट फोनमध्ये जाऊन सिस्टम अपडेटवर क्लिक करावे.

VIEW ALL

Read Next Story