तुम्हालाही चालताना मोबाईलवर टायपिंगची सवय आहे का? वेळीच सावध व्हा नाहीतर...

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2023

वेळीच सावध व्हा

तुम्ही सुद्धा चालता चालता फोनवर टायपिंग म्हणजेच टेक्सटिंग करता का? जर तुम्हाला ही अशी सवय असेल तर वेळीच सावध व्हा.

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2023

धक्कादायक माहिती समोर

मोबाईलवर टाइप करत चालणाऱ्यांसंदर्भात नुकताच एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2023

शारीरिक संतुलन बिघडण्याची शक्यता

या संशोधनानुसार चालताना टायपिंग करणाऱ्यांचं शारीरिक संतुलन बिघडण्याची शक्यता अधिक असते.

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2023

अचानक पडतात

अशी लोक चालता चालता अचानक पडतात. अनेकदा कोणत्याही गोष्टीला न अडखळता निव्वल संतुलन गेल्याने असे लोक पडतात.

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2023

हे वाक्य टाइप करत चालायला सांगितलं.

या संशोधनामध्ये सहभागी झालेल्या तरुण-तरुणींना चालता चालता 'The Quick Brown Fox Jumps Over The Lazy Frog' हे वाक्य टाइप करण्यास सांगितलं होतं.

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2023

अडखळून पडण्याची शक्यता

हा शब्द टाइप करत चालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी अनेकजण अडखळून पडण्याची शक्यता वाढल्याचं संशोधकांना दिसून आलं. या अभ्यासात 50 जण सहभागी झालेले.

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2023

शरीराची स्थिरता फार कमी

चालत चालत टायपिंग करताना शरीराची स्थिरता फार कमी असते. एकाच वेळी दोन गोष्टी सुरु असल्याने मेंदूला दोन्हीकडे एकाचवेळी लक्ष ठेवता येत नाही.

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2023

कुठे प्रकाशित झाला हा लेख

मोबाईलवर टायपिंग करत चालताना शरीराचं संतुलन बिघडतं असा दावा करणारं हे संधोधन हेलियॉन जर्नलमध्ये छापून आलं आहे. अशा दुर्घटनांमध्ये गंभीर इजा होण्याची शक्यताही असते.

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2023

सामान्य संदर्भांवरून माहिती

वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2023

VIEW ALL

Read Next Story