चार्जिंग करत असताना तुमचा फोन तुमच्या उशीखाली किंवा इतर मऊ पृष्ठभागाखाली ठेवणे टाळा. यामुळे तुमचा फोन जास्त गरम होऊन आग लागेल.
समजा तुम्हाला फोन खूप गरम होत आहे असे दिसले तर तुमचा फोन बंद करा आणि थंड होऊ द्या.
तसेच तुमचा फोन जास्त चार्ज करणे टाळावे. फोन पूर्ण चार्ज झाला की, तो चार्जरमधून अनप्लग करावा.
तसेच फोनच्या कंपनीचा मूळ चार्जर आणि केबल वापरा. स्वस्त किंवा बनावट चार्जर, जास्त चार्जिंग, जास्त गरम होणे तसेच इतर समस्यांना कारणीभूत ठरेल. ज्यामुळे तुमच्या फोनचा स्फोट होईल.
तुमचा फोन चार्ज होत असेल, खास करून थेट सूर्यप्रकाशात किंवा गरम वातावरणात वापरू नका. तुमचा फोन चार्ज करण्यापूर्वी तो थंड करा.
अशावेळी तुमचा फोन थेट सूर्यप्रकाश आणि उष्णता स्त्रोतांपासून लांब ठेवणे खूप आवश्यक आहे. उन्हाळ्यात तुमचा फोन तुमच्या कारमध्ये किंवा डॅशबोर्डवर ठेवू नका.
फोनची बॅटरी जास्त चार्ज झाल्याने फोनचे स्फोट होत आहेत. कधी-कधी लोकल चार्जरवरून फोन चार्ज केला तर फोन पेटतो. अशावेळी चार्जिंग दरम्यान फोन वापरू नये.
स्मार्टफोन वापरत असाल तर त्याची तशी निगा राखणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर तुमच्या स्मार्टफोनचा स्फोटही होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.