आजकाल प्रत्येकजण युट्यूबवर व्लॉगिंग करु लागला आहे.
लोकांना काय बघायला आवडेल, याचे व्हिडीओ बनवून लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळवले जातात.
पण युट्यूबमधून पैसे कसे कमावले जातात. याचा क्रायटेरिया काय असतो?
मॉनेटायजेशन पॉलिसी अंतर्गत युट्यूब पेमेंट करते.
पण यासाठी तुम्हाला काही क्रायटेरिया पूर्ण करावा लागेल.
युट्यूबकडून पहिलं पेमेंट घेण्यासाठी तुम्हाला किमान 1 हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करावे लागतील.
मागच्या 12 महिन्यात 4 हजार तासांचा वॉचटाइम पूर्ण व्हायला हवा.
मागच्या 3 महिन्यात चॅनलवर टाकल्या गेलेल्या शॉर्ट्सवर 10 मिलियन व्ह्यूज पूर्ण व्हायला हवेत.
दर्जेदार आणि स्वत:चा कंटेट टाकल्यास तुम्ही लवकर चांगली कमाई करु शकता.
हा क्रायटेरिया पूर्ण करुन तुम्हीदेखील युट्यूबवर लाखोंची कमाई करु शकता.