अशा स्थिती सर्व पहिले आपलं मन शांत ठेवा जेणेकरून आपण योग्य निर्णय घेऊ शकाल.
हँडब्रेक हळूहळू लावा. लक्षात ठेवा अचानक हँडब्रेक लावल्याने वाहन घसरण्याची शक्यता जास्त असते.
गियर लोअर गियरमध्ये ठेवा. मॅन्युअल वाहनांमध्ये, ते दुसऱ्या किंवा पहिल्या गीअरवर घ्या आणि स्वयंचलित वाहनांमध्ये, L (लो गियर) वापरा. त्यामुळे वाहनांचा वेग हळूहळू कमी होण्यास मदत मिळेल.
वाहन हळू हळू रस्त्याच्या कडेला जा. जास्त रहदारी नसलेल्या ठिकाणी वाहन थांबवण्याचा प्रयत्न करा.
शक्य असल्यास, वाहन गवत, खडी किंवा वाळू असलेल्या ठिकाणी न्या. त्यामुळे वाहनाचा वेग कमी होण्यास मदत मिळेल.
सतत हॉर्न वाजवा आणि धोक्याचे दिवे चालू ठेवा जेणेकरून जवळचे वाहनचालक सावध होतील.
वाहन लहान टेकडी किंवा उतारावर नेण्याचा प्रयत्न करा.
वाहन थांबवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नसल्यास भिंत, रेलिंग किंवा कर्बवर हलकेच घासा. मात्र ही पद्धत फक्त आपत्कालीन परिस्थितीतच वापरा.
आपले ब्रेक नियमितपणे सर्व्हिस करा. ब्रेक फ्लुइड तपासा. कोणताही विचित्र आवाज किंवा कंपन आढळल्यास ताबडतोब मेकॅनिकचा सल्ला घ्या.