5 जी इंटरनेटमुळे चांगली कनेक्टिव्हिटी आणि सुपरफास्ट इंटरनेट मिळते.
इतर देशांच्या तुलनेत भारतातला इंटरनेट स्पीड कमी आहे. पण भारतातल्या एका शहरात फास्ट इंटरनेट मिळतं.
नेटवर्क एक्सपेंन्शनच्या बाबतीत भारत 11 व्या स्थानी आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारताने 49 वी रॅंक मिळवली आहे.
दिल्ली, मुंबई, बंगळुरु, चेन्नई, कोलकाता, हैदराबादसारख्या मेट्रो शहरामध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटी चांगली आहे.
Ookla च्या एका रिपोर्टनुसार, भारतातील चेन्नई शहरात सर्वात फास्ट इंटरनेट मिळतं.
इथे सरासरी मोबाइल इंटरनेट स्पीड 51.07 Mbps नोंदवण्यात आलाय. जो इतर शहरांच्या तुलनेत अधिक आहे.
दुसऱ्या क्रमांकावर आणखी एक दक्षिण भारतातील शहर बंगळुरु येतं. जिथे 42.50 Mbps इंटरनेट स्पीड मिळतो.
यानंतर हैदराबादचा क्रमांक येतो जिथे 41.68 Mbps इंटरनेट स्पीड मिळतो.
देशाची राजधानी दिल्ली याबाबतीत पाचव्या स्थानी आहे. जिथे 32.39 Mbps स्पीड मिळतो.