iPhone सारखा दिसणारा फोन

Tecno Spark 20C असं या मॉडेलचं नाव. एंट्री लेव्हल युजर्ससाठीहा फोन लाँच करण्यात आला असून, कंपनीच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

लूक

हुबेहूब आयफोनसारखा लूक असणारा हा लाँच करण्यात आला असून, हल्लीच कंपनीने Tecno Spark Go 2024 फोनही मलेशियामध्ये लाँच केला.

डायनॅमिक पोर्ट

या फोनला आयफोनसारखाच डायनॅमिक पोर्ट देण्यात आला आहे. या फिचरमुळं युजर्सना कॉलिंगची उत्तम सुविधा मिळते. ज्यामुळं इनकमिंग कॉल, करंट आणि मिस्ड क़लची माहिती मिळते.

प्रोसेसर

ऑक्टा कोर-प्रोसेसर (Octa-core) CPU या फोनमध्ये देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला 6.6 इंच HD + 90Hz LCD देण्यात आला आहे.

विविध रंग

5,000 mAh ECf 18W चार्जिंग असणारा हा फोन ग्रॅव्हिटी ब्लॅक, मिस्ट्री व्हाईट, अल्पेन्ग्लो गोल्ड, मॅजिक स्किन या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

रॅम

4GB + 4GB रॅम आणि 8GB + 8GB रॅमसह या फोनमध्ये 128GB स्टोरेज देण्यात आलं आहे.

कॅमेरा

कॅमेऱ्याचं म्हणाल, तर फोनला 50MP+AI-CAM आणि ड्युअल फ्लॅश 8MP सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. या फोनच्या किमतीची मात्र अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

VIEW ALL

Read Next Story