Jio चा सर्वात स्वस्त 5G प्लान; मिळेल डेटा, कॉलिंग आणि बरंच काही...

Pravin Dabholkar
May 27,2025


जिओ तुम्हाला स्वस्त ते महाग असे अनेक प्लान्स ऑफर करते. पण सर्वांमध्येच 5 जी सुविधा नसते.


काही ठराविक प्लान्समध्ये 5 जी सुविधा मिळते. जिओच्या सर्वात स्वस्त 5 जी प्लानबद्दल जाणून घेऊया.


आपण जियोच्या 198 रुपयांच्या प्लानबद्दल बोलतोय. जो कमी कालावधीसाठी येतो. ज्यात तुम्हाला खूप फायदे मिळतात.


हा केवळ जियोच नव्हे तर भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीतली सर्वात स्वस्त 5 जी प्लान आहे. यात तुम्हाला कॉलिंगसोबत अनेक फायदे मिळतात.


जिओच्या या प्रिपेड प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉइस कॉलिंगसोबत रोज 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतात.


यासोबत जियो टीव्ही आणि जियो क्लाऊडचा एक्सेसदेखील मिळतो. या प्लानमध्ये 14 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते.


कोणते अतिरिक्त शुल्क न भरता तुम्हाला अतिरिक्त 5 जी डेटा मिळतो. यासाठी तुमच्याकडे 5 जी नेटवर्क आणि ते सपोर्ट करणारा फोन असावा.


5 जी डेटा वापरण्यावर कोणते लिमिट नाही. तुम्ही पाहिजे तितका डेटा वापरु शकता. 5 जी डेटा वापरणाऱ्यांसाठी ही चांगली ऑफर आहे.


जिओ आपल्या ग्राहकांना 5 जी डेटा ऑफर करत असताना एअरटेल आणि व्हीआय महिन्याचा 300 जीबी डेटाच ऑफर करतात.

VIEW ALL

Read Next Story