Recharge Plan: Jio ने एअरटेल, VIची उडवली झोप, 48 ते 545 रुपयांपर्यंत 5 नवे प्लान्स!

Pravin Dabholkar
May 23,2025


जिओने 5 नवे प्लान्स आणलेयत. प्रीपेड युजर्सना त्याचा खूप फायदा होईल.


यात तुम्हाला जिओ गेमिंग क्लाऊड सर्व्हिस मिळेल. यामुळे प्रिमियम गेम्स खेळता येतील.


जिओ गेम्स क्लाऊडच्या मदतीने सेटटॉप बॉक्स, कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनवर प्रिमियम गेम्स खेळता येतील. यासाठी तुम्हाला प्रो पासची गरज नाही.


जिओ गेम्स क्लाऊडचा प्रो पास 398 रुपयांना येतो. यात तुम्हाला 28 दिवस एक्सेस मिळेल.


आता कंपनीने गेमिंग प्लानची नवीन कॅटेगरी जोडलीय. यात 5 प्लान्स दिसतायत. ज्यात 3 अॅडऑन आणि 2 प्रॉपर आहेत.


48 रुपयात कंपनी 10 एमबी डेटा आणि 3 दिवसांचे जिओ गेम क्लाऊडचा एक्सेस देते. यासाठी तुमच्याकडे एक्टिव्ह बेस प्लान असणे गरजेचे आहे.


याचप्रकारे कंपनी 98 रुपयात कंपनी 7 दिवसांसाठी 100 एमबी डेटा आणि जिओ गेम क्लाऊडचा एक्सेस देते. तर 298 रुपयांत 3 जीबी डेटा आणि जिओ गेम क्लाऊडचा 28 दिवसांचा एक्सेस देते.


अॅड ऑन व्यतिरिक्त कंपनी आणखी 2 प्लान ऑफर करते. 495 रुपयांचा प्लान 28 दिवसांच्या वॅलिडीटीसह येतो.


यामध्ये रोज दीड जीबी डेटा अधिक 5 जीबी डेटा अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात. जिओ गेम क्लाऊड आणि हॉटस्टारचा मोबाईल एक्सेस मिळतो.


545 रुपयांत हे सर्व फायदे मिळतात. यात रोजच्या 2 जीबीसह अनलिमिटेड 5जीबी एक्सेस मिळेल.

VIEW ALL

Read Next Story