Jio चा एअरटेल, VIला दणका, अवघ्या 100 रुपयांत तगडा प्लान!

Pravin Dabholkar
May 31,2025


जिओ तुम्हाला स्वस्त ते महाग असे सर्व प्रकारचे प्लान्स ऑफर करते. यासोबत काही खास प्लान्सदेखील कंपनी देत असते.


जिओचा 100 रुपयांचा प्लान सोशल बेनिफिट्ससोबत येतो. हा एक डेटा वाऊचर आहे.


या प्लानमध्ये तुम्हाला डेटासोबत जिओ हॉटस्टार सब्सस्क्रिप्शन मिळेल. हा कंपनीचा सर्वात स्वस्त प्लान आहे. ज्यात जियो हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळते.


100 रुपयांच्या जिओ रिचार्ज वाऊचरमध्ये तुम्हाला 5 जीबी डेटा आणि 90 दिवसांची वॅलिडिटी मिळते.


90 दिवसांसाठी तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म एक्सेस मिळेल. पण यात तुम्हाला महिन्याचा रिचार्ज संपल्यानंतर 48 तासांच्या आत करावा लागेल.


48 तासांच्या आत रिचार्ज केला नाहीत तर तुम्हाला जियो हॉटस्टार बेनिफिट्स मिळणार नाहीत.


या ऑफरसोबत कंपनी तुम्हाला जियो हॉटस्टार टीव्ही आणि मोबाईल प्लान देते. ज्याची सुरुवात 299 रुपयांपासून होते.


म्हणजे तुम्हाला 100 रुपयात डेटा आणि 299 रुपयांचा प्लान असं दोन्ही मिळेल. या रिचार्जसाठी तुमच्याकडे अॅक्टीव्ह बेस प्लान असावा.


ज्यांना जियो हॉटस्टार हवाय, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. यात कमी किंमतीत तुम्हाला जास्त बेनिफिट्स मिळू शकतील.

VIEW ALL

Read Next Story