Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज! अवघ्या 51 रुपयांत अनलिमिटेड 5G आणि बरंच काही...

Pravin Dabholkar
Jun 04,2025


Jio Offer: जिओ आपल्या 47 कोटींहून अधिक मोबाइल यूजर्ससाठी सतत चांगल्या ऑफर आणत असते. देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एक उत्तम ऑफर घेऊन आलीय.


ज्यामध्ये यूजर्सना फक्त 51 रुपये खर्च करून संपूर्ण महिनाभर अमर्यादित 5जी डेटा मिळेल.


5जी स्मार्टफोन यूजर्सना जिओच्या या ऑफरचा फायदा होईल. ही ऑफर विशेषतः जिओच्या 5जी नेटवर्क असलेल्या परिसरात राहणाऱ्यांसाठी आहे. जर तुम्हीही जिओ यूजर्स असाल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.


जिओच्या वेबसाइटनुसार, हा कंपनीचा फक्त डेटा प्लॅन आहे. ज्यामध्ये यूजर्सना अमर्यादित 5जी डेटा तसेच 3 जीबी हाय स्पीड 4जी डेटाचा लाभ मिळेल. या डेटा पॅकची व्हॅलिडीटी यूजर्सच्या सध्याच्या रिचार्ज प्लॅनपर्यंत राहील.


त्याचप्रमाणे या डेटा पॅकला आधीच चालू असलेल्या कोणत्याही सक्रिय प्लॅनसह जोडून ​​तुम्ही अनलिमिटेड 5जी डेटा मिळवू शकता. याशिवाय यूजर्सना जिओच्या 101 आणि 151 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमटेड 5जी डेटाचा लाभ देखील मिळेल.


जिओने वर्षाच्या सुरुवातीला डेटाशिवाय दोन प्रीपेड प्लॅन लाँच केले. ट्रायच्या आदेशानुसार टेलिकॉम कंपनीने हे दोन्ही प्लॅन अशा यूजर्ससाठी आणले जे फीचर फोन वापरतात आणि ज्यांना डेटाची आवश्यकता नाही.


जिओचे हे दोन्ही प्लॅन 84 दिवस आणि 336 दिवसांच्या वॅलिडिटीसह येतात. जिओच्या 336 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन 1748 रुपयांना येते.


यातून भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि मोफत राष्ट्रीय रोमिंगचा लाभ मिळेल.


याशिवाय 3600 मोफत एसएमएसचा फायदा देखील मिळेल. तसेच जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचा मोफत एक्सेस मिळेल.


या प्लॅन व्यतिरिक्त यूजर्स कंपनीच्या 189 आणि 448 रुपयांच्या प्लॅनसह 51 रुपयांच्या डेटा पॅकला जोडून संपूर्ण महिन्यासाठी अमर्यादित 5जी डेटाचा लाभ घेऊ शकतात.


अनलिमिटेड 5जी डेटाचा लाभ घेण्यासाठी यूजर्सकडे 5जी सुसंगत स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. तुम्ही 5जी नेटवर्क असलेल्या क्षेत्रात असाल तरच हा अमर्यादित 5जी डेटाचा लाभ घेऊ शकतात.

VIEW ALL

Read Next Story