दक्षिण कोरियन कार निर्माता कंपनी KIA ने नुकतंच भारतीय बाजारपेठेत आपली प्रसिद्ध एसयुव्ही Kia Seltos च्या फेसलिफ्ट मॉडेलला लाँच केलं होतं.
आकर्षक लूक आणि काही बदल केल्यानंतर एसयुव्हीला नव्या अंदाजात समोर आणलं होतं. दरम्यान या एसयुव्हीमधील काही फिचर्स हटवल्यानंतर तिची किंमत कमी झाली आहे.
जुलैमध्ये लाँच झालेल्या Seltos Facelift ची सुरुवातीची किंमत 10.90 लाख ठरवण्यात आली होती. टॉप मॉडेलसाठी ही किंमत 20.30 लाखांपर्यंत जात होती.
Carwale नुसार, Seltos च्या काही निवडक व्हेरियंट्सची किंमत 2000 ने कमी करण्यात आली आहे. ही किंमत तशी जास्त नाही. पण यामुळे ग्राहकांना काही फिचर्स मिळणार नाहीत.
महत्त्वाचं म्हणजे, KIA India ने नुकतंच एसयुव्हीच्या किंमतीत 30 हजारांची वाढ केली होती. पण फिचर्स हटवल्यानंतर किंमतीत घट करण्यात आली आहे.
HTX आणि त्याच्यावरील सर्व व्हेरियंटमध्ये (एक्स-लाइन वगळता) आता सर्व पॉवर विंडोसाठी वन टच अप-डाउन फिचर मिळणार नाही. याच फिचरमुळे किंमत कमी झाली आहे.
आता सेल्टोसच्या फक्त एक्स-लाइन व्हेरियंटमध्ये वन टच अप-डाउन फिचर मिळतं. इतर व्हेरियंटमध्ये फक्त ड्रायव्हर सीटसाठी हे फिचर आहे.
Kia Seltos मध्ये कंपनीने 1.5 लीटर क्षमतेच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा वापर केला आहे. यामध्ये सर्वात अत्याधुनिक 2 ADAS सिस्टमचा वापर करण्यात आला आहे.