तुम्हाला 80-90 च्या दशकातील प्रसिद्ध मोडेल कायनेटिक लुना आठवत असेल, पुन्हा एकदा तुमची आवडती 'लुना' धमाल करायला तयार आहे.
विशेष बाब म्हणजे, यावेळी लूना इलेक्ट्रिक अवतारात परतत असून कंपनीने याला ई-लुना असे नाव दिले आहे. या इलेक्ट्रिक लुनाचे अधिकृत बुकिंग उद्यापासून म्हणजेच २६ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार असून त्यासाठी फक्त ५०० रुपये मोजावे लागतील.
इलेक्ट्रिक लुनाची प्री-बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून केली जाऊ शकते. तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आणि पत्ता येथे टाकावा लागेल. कायनेटिकने अहमदनगर, पुणे येथील त्यांच्या प्लांटमध्ये त्यांच्या प्रतिष्ठित मॉडेल लुना इलेक्ट्रिकचे उत्पादन सुरू केले आहे.
कायनेटिक लुना 50 वर्षांपूर्वी म्हणजेच 1972 मध्ये भारतीय बाजारपेठेत पहिल्यांदा सादर करण्यात आली होती. त्यावेळी ही परवडणारी मोपेड प्रत्येकाचे दुचाकीचे स्वप्न पूर्ण करत होती.
हे मोपेड 90 च्या दशकाच्या अखेरीपर्यंत खूप लोकप्रिय होते, परंतु कालांतराने त्याची क्रेझ कमी होत गेली आणि शेवटी 2000 सालापर्यंत त्याचे उत्पादन बंद झाले.
जेव्हा हे मोपेड सादर करण्यात आले तेव्हा कंपनीने त्याच्या जाहिरातीसाठी एक जिंगल वापरली, "चल मेरी लुना" जी खूप लोकप्रिय झाली.
कंपनीने इलेक्ट्रिक लूनाचे तपशील अद्याप उघड केले नसले तरी त्याची रेंज सुमारे 70-75 किमी असणे अपेक्षित आहे. हे शक्य आहे की ई-लुना 2kWh बॅटरी पॅकसह फिट केली जाईल आणि त्याचा टॉप स्पीड 60 किमी प्रतितास पर्यंत असू शकतो.