घरामध्ये वायफाय लावल्यानंतर काही वर्षांनी, नेट खूप स्लो आहे अशा अनेकांच्या तक्रारी असतात.
यावेळी राउटर चुकीच्या ठिकाणी लावला आहे, म्हणून घरामध्ये सगळीकडे नेटवर्क पोहोचत नाही असे वाटते.
पण जर तुम्हाला हाय-स्पीड इंटरनेट हवे असेल तर, काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
यासाठी वाय-फाय राउटर दर 3 ते 5 वर्षांनी बदलणे आवश्यक आहे.
अनेकदा इंटरनेट प्लॅन बदलल्यामुळे जुना राउटर त्याला सपोर्ट करत नाही, ज्यामुळे देखील वाय-फाय स्लो होतो.
तसेच जुन्या राउटरची स्मार्टफोन आणि लॅपटॉप कनेक्टिव्हिटी देखील कमकुवत होत जाते.
मुख्य म्हणजे जुन्या राउटरला डिजिटल सुरक्षिततेचे नवे अपडेट नाही मिळाल्यास, हॅकिंगचा धोका वाढतो.
जर तुम्हाला राउटर सतत सुरू-बंद करावा लागत असेल तर, तो निश्चितच खराब झाला आहे.
योग्यवेळी राउटर बदलल्याने डिजिटल सुरक्षा आणि इंटरनेटची स्पीडही वाढते.