फक्त 6 लाखात पूर्ण होईल SUV चं स्वप्न; कमी खर्चात लुटा स्पोर्टी ड्रायव्हिंगचा आनंद

Oct 24,2023

SUV ची वाढती मागणी

स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल म्हणजेच SUV गाड्यांची मागणी सतत वाढत आहे. लोकांना कॉम्पॅक्ट आणि छोटी एसयुव्ही कार आवडतात. या कार कमी खर्चात स्पोर्टी ड्रायव्हिंगचा आनंद देतात.

6 लाखात पूर्ण होईल SUV चं स्वप्न

अशाच काही मोजक्या एसयुव्हींबद्दल जाणून घ्या. कमी खर्चात या गाड्या खरेदी करत तुम्ही एसयुव्हीचं स्वप्न पूर्ण करु शकता.

Tata Punch

टाटा पंच 1.2 लीटर पेट्रोल-इंजिनसह येते. हे इंजिन 86PS पॉवर आणि 113Nm चा टॉर्क जनरेट करते. याला 5 स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन आणि ऑप्शनल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गेअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे.

किंमत - 6 ते 10.10 लाख

Tata Punch मध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, सेमी-डिजिटल इन्स्ट्रूमेंट पॅनल, ऑटो एअर कंडिशनिंग, स्वयंचलित हेडलाइट्स, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि क्रूझ कंट्रोल आहे. यामध्ये 366 लीटरचा बूट स्पेस मिळतो.

Renault Kiger

Renault ची ही एसयुव्ही 1 लीटर नॅच्यूरल एक्स्पायर्ड आणि 1 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह येते.

किंमत - 6.50 ते 11.23 लाख

Renault Kiger मध्ये 405 लीटरचा बूट स्पेस मिळतो. यामध्ये 8 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 7 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पुश बटन स्टार्ट असे फिचर्स मिळतात.

Nissan Magnite

या कारमध्येही Renault सारखा इंजिनचा पर्याय आहे. यामध्ये 8 इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम आहे, जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कारप्ले यांना सपोर्ट करते.

किंमत - 6 ते 11.2 लाख

Nissan Magnite मध्ये 7 इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 16 इंचाचा ड्युअल टोन एलॉय, LED डे टाइम रनिग लाइट्स, एलईडी हेडलाइट आणि रियर वेंट्सह ऑटो एअर कंडिशनिंग यांचा सहभाग आहे.

Hyundai Exter

Hyundai Exter 1.2 लीटर कप्पा पेट्रोल इंजिन आणि 1.2 लीटर बायो फ्यूअल कप्पा पेट्रोल इंजिन सीएनजीसह येते. यामध्ये 40 पेक्षा जास्त सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत.

किंमत - 6 ते 10.15 लाख

याचं पेट्रोल व्हेरियंट जवळपास 19 किमी/लीटर आणि सीएनजी व्हेरियंट 27 किमी/किलो मायलेज देतं. यामध्ये 20 असे फिचर्स देण्यात आले आहेत जे या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहेत.

Maruti FRONX

नव्या Maruti FRONX मध्ये दोन पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. ही कार 1.0 टर्बो पेट्रोल आणि 1.2 पेट्रोल इंजिनसह येते. ही एसयुव्ही 21 किमी/लीटरचा मायलेज देते.

Maruti FRONX ची किंमत 7.46 ते 13.13 लाखापर्यंत आहे.

VIEW ALL

Read Next Story