भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Top 10 Cars

सर्वाधिक विकेलेली दहाव्या क्रमांकाची कार

टाटा नेक्सॉन ही भारतात ऑगस्टमध्ये विकली गेलेली दहाव्या क्रमांकाची कार आहे. या कारचे एकूण 12 हजार 289 युनिट्स विकले गेलेत.

यादीत नवव्या स्थानी

मारुती सुझुकीची फ्रोनेक्स ही सर्वाधिक विकली गेलेली नवव्या क्रमांकाची कार आहे. या कारचे एकूण 12 हजार 387 युनिट्स विकले गेले आहेत.

मारुतीची ही कार आठव्या स्थानी

मारुती सुझुकी बलेनो ही सर्वाधिक विक्री झालेली आठव्या क्रमांकाची कार आहे. या कारचे एकूण 12 हजार 485 युनिट्स विकले गेलेत.

महिंद्राची कार सातव्या क्रमांकावर

महिंद्रा स्कॉर्पिओ ही सातव्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री झालेली कार आहे. या कारचे 12 हजार 723 युनिट्स विकले गेलेत.

सहाव्या क्रमांकावर मारुतीची कार

सहाव्या क्रमांकावर मारुती सुझुकी स्विफ्ट ही कार असून या कारचे 12 हजार 844 युनिट्स विकले गेले आहेत.

पाचव्या क्रमांकावर आहे टाटाची ही कार

टाटा कंपनीची पंच गाडी सर्वाधिक विकल्या गेलेल्या गाड्यांच्या यादीत 15 हजार 642 युनिट्ससहीत पाचव्या क्रमांकावर आहे.

चौथ्या क्रमांकावर ही कार

मारुती सुझुकी वॅगनआर ही गाडी सर्वाधिक विकेलेली चौथ्या क्रमांकाची कार असून या कारचे एकूण 16 हजार 450 युनिट्स विकले गेलेत.

तिसरी सर्वाधिक विकलेली कार

ह्युंडाई क्रेटा गाडी सर्वाधिक विकल्या गेलेल्या गाड्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असून या गाडीचे 16 हजार 762 युनिट्स विकले गेलेत.

दुसऱ्या क्रमांकावर...

दुसऱ्या क्रमांकावर आहे, मारुती सुझुकी एर्टिगा! या कारचे ऑगस्टमध्ये 18 हजार 580 मॉडेल विकले गेले.

सर्वाधिक विकली गेलेली कार...

पहिल्या क्रमांकावर आहे मारुती सुझुकी ब्रिझा! या गाडीचे महिन्याभरात 19 हजार 190 युनिट्स विकले गेले. या कारची मुंबईतील ऑन रोड प्राइज 9 लाख 73 हजारांपासून सुरु होते.

दिवसाला किती कार विकल्या गेल्या?

...म्हणजेच ऑगस्ट महिन्यात भारतात रोज 619 लोकांनी मारुती सुझुकी ब्रिझा विकत घेतली. ही कार 17 ते 20 किलोमीटर प्रती लीटरचं मायलेज देते.

VIEW ALL

Read Next Story