मारुती वॅगनआर ही फेब्रुवारी 2025 मधील सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे.
मारुती वॅगनआर कारला कमी किंमत आणि कमी देखभाल तसेच जास्त मायलेजसाठी पसंती मिळत आहे.
ही कार पेट्रोलसह सीएनजी मॉडेलमध्ये देखील उपलब्ध आहे. जी 33 किमी मायलेज देते.
जर तुम्हाला देखील मारुती वॅगनआरची सीएनजी कार खरेदी करायची असेल तर यामध्ये दोन पर्याय आहेत.
मारुती वॅगनआर LXI हे बेस मॉडेल आहे. या कारची दिल्लीमध्ये एक्स शोरुम किंमत सुमारे 6.55 लाख रुपये आहे.
तर मारूती वॅगनआर LXI CNG कारची ऑन-रोड किंमत 7.32 लाख रुपयांपर्यंत आहे.