ट्विटरनंतर आता सोशल मीडियामधील सर्वात मोठी कंपनी मेटा फेसबूक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या व्हेरिफाइड खात्यासाठी शुल्क आकारणार आहे.
फेसबुकची मूळ कंपनी मेटा वेगवेगळ्या मार्गातून महसूल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीचे हे प्रयत्न पाहता पडताळणी सेवा म्हणजेच व्हेरिफेकेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार आता मेटाने फेसबूक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवरील व्हेरिफाइड खात्यांसाठी मासिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. एका महिन्याच्या सदस्यासाठी 699 रुपये मोजावे लागणार आहेत.
Meta ने आपल्या निवेदनात अशी माहिती दिली आहे की येत्या काही महिन्यांत वेबवर 599 रुपये प्रति महिना दराने सत्यापित सेवा सुरू करण्याचा विचार आहे.
‘मेटा व्हेरिफाईड सेवा भारतात इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. लोक ही सेवा iOS आणि Android वर 699 रुपये प्रति महिना दराने घेऊ शकतात.
फेसबूक आणि इंस्टाग्रामच्या वापरकर्त्यांना सदस्यता घ्यायची असेल तर त्यांना सरकारी ओळखपत्राने त्यांचे खाते व्हेरिफाइड करावे लागणार आहे. त्यानंतर वापरकर्त्यांना त्यांचे व्हेरिफाइड केले जाईल, आणि बनावट खात्यांपासून युझरला वाचवले जाईल.
"जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये आमच्या सुरुवातीच्या चाचणीचे चांगले परिणाम पाहिल्यानंतर आम्ही आमच्या मेटा व्हेरिफाइड चाचणीचा भारतात विस्तार करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
युझरला आपले खाते व्हेरिफाइड करण्यासाठी काही पात्रता आवश्यक आहे. युझरने केलेले पोस्ट आणि युझर हा किमान 18 वर्ष पूर्ण केलेला असावा.
अर्ज करत असलेले युझरला Facebook किंवा Instagram खात्याच्या प्रोफाइल नाव आणि फोटोशी जुळणारा सरकारी आयडी सबमिट करणे आवश्यक असणार आहे.
मेटा ने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आपली सशुल्क सबस्क्रिप्शन सेवा ‘Meta Verified’ लॉन्च करण्याची घोषणा केली होती. कंपनीने त्यावेळी ही सेवा फक्त अमेरिकेत उपलब्ध करून दिली होती.