केवल ऑन आणि ऑफ एवढा मोजका वापर न करता मोबाईल टॉर्चचा नक्कीच हटके वापर करता येईल.
आपल्यापैकी अनेकजण केवळ टॉर्च ऑन आणि ऑफ एवढेच फंक्शन वापरतात.
मात्र टॉर्चच्या थम्बनेलवर खालच्या बाजूस क्लिक केलं तर टॉर्चच सेटींग ओपन होतं. यामधून टॉर्चचा प्रकाश तुम्ही कमी जास्त करु शकता.
मोबाईलमधील प्लॅश टॉर्चचा वापर नोटिफिकेशनसाठीही करता येईल.
सेटिंगमध्ये जाऊन Accessibility पर्याय निवडावा. त्यानंतर तिथे Advanced Settings पर्याय दिसेल. या पर्यायामधील Flash Notification पर्याय निवडावा
Flash Notification च्या पर्यायामध्ये Screen flash notification आणि Camera flash notification असे दोन पर्याय दिसतील.
यापैकी Camera flash notification वर क्लिक करावं. हा पर्याय निवडल्यानंतर प्रत्येक नोटिफीकेशनला तुमच्या मोबाईलची टॉर्च ब्लिंक होईल.
तुमच्या मोबाईलमध्येही नक्कीच या टॉर्च लाइटसंदर्भातील सेटिंग असतील. त्या तपासून पाहा आणि या टॉर्चचा वेगळ्यापद्धतीनेही वापर नक्की करा.