आजकाल जो पहावा तो मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेला असतो. अगदी पाच ते सात वर्षांचा चिमुकला असो, तरुण असो, उद्योजक असो किंवा वयस्कर आजोबा असो सगळीकडे हेच चित्र पाहायला मिळतं.
मात्र भारतीय लोक आपल्या मोबाईलमध्ये नेमकं काय पाहत असतात? याचा कधी विचार केला आहे का? याबद्दलच एक अहवाल समोर आला आहे.
फेब्रुवारी महिन्यात Semrush Traffic चा एक अहवाल समोर आला होता. त्यामध्ये भारतातील लोक सर्वाधिक वेळा गुगलला भेट देतात असं दिसून आलं.
गुगल खालोखाल दुसऱ्या क्रमाकांवर भारतीयांकडून सर्वाधिक भेट दिली जाता असे प्लॅटफॉर्म युट्यूबचा आहे.
या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर इन्स्टाग्राम ही सोशल मिडिया वेबसाईट असून ही भारतीयांकडून पाहिली जाणारी सर्वात लोकप्रिय सोशल मिडिया वेबसाईट आहे.
एकीकडे जगभरामध्ये फेसबुकची लोकप्रियता कमी होत असतानाच दुसरीकडे भारतात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या साईट्समध्ये फेसबुक चौथ्य स्थानी आहे.
या यादीमध्ये पाचव्या क्रमाकांवर व्हॉट्सअप असून आता अनेकजण एआयसंदर्भात साईट्सलाही भेट देऊ लागल्याचं अहवालातून समोर आलं आहे.