40 मिनिटांत चार्ज, 408 Km रेंज, किंमत 10 लाखांहून कमी; नव्या Electric Car चे फिचर्स थक्क करणारे

इलेक्ट्रिक कार्सच्या मागणी वाढली

जगभरामध्ये इलेक्ट्रिक कार्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक कंपन्या आता इलेक्ट्रिक कार्सच्या सेगमेंटमध्ये एन्ट्री करत आहेत.

कंपन्यांचा प्रयत्न

अनेक कंपन्या छोट्या आकाराच्या म्हणजेच मिनी इलेक्ट्रिक कार्सही लॉन्च करत आहेत. परवडणाऱ्या किंमतीत इलेक्ट्रिक कार्स उपलब्ध करुन देण्याचा कंपन्यांचा प्रयत्न आहे.

नव्या कारचं मिनी व्हर्जन

आता चीनमधील प्रमुख इलेक्ट्रिक कार कंपनी असलेल्या Chery (चेरीने) कंपनीने आपल्या नव्या कारचं मिनी व्हर्जन बाजारात आणलं आहे.

लूक फारच आकर्षक

लिटील अॅण्ट नावाच्या या मिनी इलेक्ट्रिक कारचा लूक फारच आकर्षक आहे. ही कार वेगवेगळ्या बॅटरीच्या पर्यायासहीत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

दिसायला फारच गोंडस

लिटील अॅण्ट नावावरुनच ही मिनी कार असल्याचं स्पष्ट होत आहे. ही कार दिसायला फारच गोंडस आहे.

4 लोक प्रवास करु शकतील

दोन दरवाजे असलेली ही इलेक्ट्रीक कार दिसायला छोटी असली तरी तिच्यामध्ये 4 लोक प्रवास करु शकतील.

फ्रंट ग्रिल अन् इतर बदल

कंपनीच्या आधीच्या क्लासिक व्हर्जनचं हे अपडेटेड व्हर्जन असून त्यामध्ये नवीन फिचर्स आणि कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. गाडीमध्ये फ्रंट ग्रिल, डीआरएलबरोबरच नवीन लोगो देण्यात आला आहे.

पॅनल अपडेट केलं

कारचं साईड पॅनल अधिक आकर्षक करण्यात आलं असून रेअर प्रोफाइलही अपडेट करण्यात आलं आहे. ही कार 7 आकर्षक रंगात उपलब्ध आहे.

कारची साईज किती?

कारची लांबी 3242 मिलीमीटर, रुंदी 1670 मिलीमीटर, उंची 1550 मिलीमीटर आणि व्हीलबेस 2150 मिलीमीटरचा आहे. या कारचं ग्राऊण्ड क्लिअरन्स 120 मिमी इतकं आहे.

टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम

या इलेक्ट्रिक कारमध्ये नवीन डॅशबोर्ड देण्यात आला असून त्यावर 10.1 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम देण्यात आली आहे. मॉर्डन स्टेअरींग व्हील, एअर व्हेंट्स दिसत आहेत. केबिन छोटं असलं तरी अनेक फिचर्स यात आहेत.

कारमध्ये अनेक फिचर्स

पॉवर अॅडजेस्टेड ड्रायव्हर सीट, वायरलेस चार्जिंग, लेदर सीट अपहोल्स्ट्री, हिटेड सिट्स, स्टेअरिंग व्हील, एलईडी लाईट्सहीत मोठा मेकअप मिरर आणि पीएम 2.5 एअर फिल्टर कारमध्ये दिला आहे.

बूट स्पेस वाढवला

या इलेक्ट्रीक कारमध्ये व्हॉइस कंट्रोल आणि रिमोट फ्रॅक्शन एकाच अॅपमध्ये देण्यात आलं आहे. कारच्या मागील सीटमध्ये फोल्ड बूट स्पेस वाढवून देण्यात आला आहे.

सुरक्षेचीही घेतली आहे काळजी

सुरक्षेबद्दल बोलायचं झाल्यास कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी कंट्रोल, हिल असिस्ट कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, रेअऱ पार्किंग सेन्सर, पॅडेस्ट्रियन वॉकिंग सिस्टीम, क्रूज कंट्रोल, ऑलोमेटिक पॉवर ऑफ सारखे फिचर्स आहेत.

3 वेगवेगळे बॅटरीचे पर्याय

या कारमधील बेसिक मॉडेलमधलं इलेक्ट्रिक मोटर 50 पीएसची पॉवर आणि 95 एनएमचं टॉर्क निर्माण करतं. यामध्ये 3 वेगवेगळे बॅटरीचे पर्याय दिले असून त्यांची क्षमता वेगवेगळी आहे.

कोणत्या मॉडेलची रेंज किती?

25.05 kWh ची क्षमता असलेल्या व्हेरिएंट 251 किमी रेंज देतं. तर 28.86 kWh ची क्षमता असलेल्या लिथियम बॅटरी व्हेरिएंटची रेंज 301 किमी आहे.

408 किमी रेंज

टॉप एण्ड व्हेरिएंट 76 पीएसची पॉवर आणि 150 एनएम टॉर्क जनरेट करतं. या मॉडेलची क्षमता 40.3 kWh ची असून लिथियम बॅटरी पॅक 408 किमी रेंज देते.

वेगवेगळ्या व्हेरिएंटची किंमत किती?

चेरीच्या या मिनी इलेक्ट्रिक कारची किंमत 77,900 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 8.92 लाख रुपये आहे. टॉप मॉडेल 82,900 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 9.49 लाख रुपयांना आहे.

VIEW ALL

Read Next Story