भारतातील ऑडीची एकमेव कार नीता अंबानींकडे, किंमत ऐकून व्हाल हैराण

Nita Ambani Audi Car: भारतातील मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​प्रमुख मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी संपत्तीच्या बाबतीत मोठ्या लोकांना मागे सोडले आहे.

लोकं एखाद्याची ओळख त्याच्या बुटांवरुन करतात, अशी एक म्हणं आहे.मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी ही म्हण खूप गांभीर्याने घेतलीय. त्या जगातील सर्वोत्कृष्ट ब्रँडचे शूज परिधान करताना दिसतात.

नीता अंबानी पुन्हा कधीही तेच शूज घालत नाहीत. त्याच्या अत्यंत महागड्या शू कलेक्शनमध्ये पेड्रो, जिमी चू, गार्सिया आणि मार्लिन सारख्या ब्रँडचे शूजचा समावेश आहे.

नीता अंबानी यांनी ऑडीची स्पेशल एडिशन Audi A9 Chameleon खरेदी केलीय. ऑडीची ही स्पेशल एडिशन कार बाजारात दाखल झालेली नाही. ही कार भारतात उपलब्ध नाही.

नीता अंबानी यांच्या खास विनंतीवरुन अमेरिकेतून ऑडी A9 कॅमेलियनची मागणी करण्यात आली. नीता अंबानी त्यांच्या Audi A9 Camelion मधून ऑफिसमध्ये येतात.

Audi A9 Chameleon ही अतिशय शक्तिशाली आणि जगातील सर्वात आलिशान कार आहे. ऑडीने कॅमेलियनची विक्री फक्त निवडक ग्राहकांना केली आहे. याचे फक्त काही युनिट्स बनवले आहेत.

ही कार मोठ्या प्रमाणात बनवण्यात आली नाही. ही जगातील दुर्मिळ कार आहे, त्यामुळे त्यांची मागणी लक्षात घेऊन ऑडी कॅमेलियन कार बनवते, असे लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडीने सांगितले.

सुमारे 5 वर्षांपूर्वी नीता अंबानी यांनी 100 कोटी रुपयांची Audi A9 Cameleon कार खरेदी केली होती. ऑडीच्या म्हणण्यानुसार 100 कोटी रुपयांची ही कार लोकांच्या खास विनंतीवर बनवण्यात आली आहे.

VIEW ALL

Read Next Story