एलॉन मस्कची 'टेस्ला' ही कार कंपनी मागील बऱ्याच वर्षांपासून लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
टेस्ला कंपनीच्या इलेक्ट्रिक कार तर लोकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत.
यावर्षी टेस्लाच्या कार भारतात लॉन्च करण्याचा एलॉन मस्कने दावा केला आहे.
मार्टिन एबरहार्ड आणि मार्क टारपेनिंग हे टेस्ला कंपनीच्या संस्थापकांचे नाव आहे. टेस्ला कंपनीची स्थापना 2003 साली झाली होती.
परंतु, एलॉन मस्कने त्याच्या कंपनीचे नाव कोणाच्या नावावरुन ठेवले? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. जाणून घ्या, याचं उत्तर.
एलॉन मस्कने आपल्या टेस्ला कंपनीचे नाव निकोला टेस्ला या नावावरुन ठेवले.
निकोला टेस्ला हे एक प्रसिद्ध वैज्ञानिक आणि संशोधक होते. निकोला यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि विद्युतचुंबकत्व या महत्त्वपूर्ण क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे.
टेस्ला यांचा नाविन्यपूर्ण विचार आणि विद्युत क्षेत्रातील त्यांचे काम विचारात घेऊन मस्कने आपल्या कंपनीचे नाव निकोला यांच्या सन्मानार्थ ठेवलं आहे.