Free Wi Fi

रेल्वे स्टेशन, हॉटेलमध्ये Free Wi Fi वापरणं धोक्याचं; टाळा ' या ' चुका

फ्री वायफाय

फ्री वायफायच्या मदतीनं खोट्या नेटवर्क कनेक्शनचा वापर करत हॅकर्स सहजपणे तुमच्या फोनचा डेटा चोरू शकतात.

मॅन-इन-द-मिडल

मॅन-इन-द-मिडल या प्रकारचे हॅकर्स तुमचा डेटा चोरण्यासाठी सध्या बरेच सक्रिय आहेत. असुरक्षित वायफाय नेटवर्क कनेक्शन युजर्स या हल्यांना बळी पडतात.

दोनपेक्षा अधिक पार्टीसिपेंट्स

फ्री वायफायमध्ये दोनपेक्षा अधिक पार्टीसिपेंट्स असून, त्यांच्या मध्ये थर्ड पार्टी देखील असते.

डेटा डिरेक्ट सर्वर

थर्ड पार्टीच्या उपस्थितीमुळे डेटा डिरेक्ट सर्वर आणि क्लाईंटमध्ये ट्रान्सफर होत नाही, ज्याचा वापर करून हॅकर्स डेटा चोरतात.

बँक अकाऊंट डिटेल्स

हॅकिंगमुळे तुमचा पर्सनल डेटा अर्थात खासगी माहिती, बँक अकाऊंट डिटेल्स, ऑनलाइन व्यवहार हे सर्व हॅकर्सच्या हाती लागू शकतं.

पेजचा URL चेक करा

हॅकिंगपासून तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी, कोणत्याही साइटवर पासवर्ड एंटर करताना नेहमी त्या पेजचा URL चेक करा.

ब्राऊजरच्या सुचनेकडे लक्ष द्या

ब्राऊजरच्या सुचनेकडे लक्ष देणे आणि एखाद्या संकेतस्थळाला भेट देताना URL मध्ये https नसेल तर पेज लॉगआउट करूनही तुम्ही हॅकिंगपासून सुरक्षित राहू शकता. (सर्व फोटो छाया सौजन्य- सोशल मीडिया)

VIEW ALL

Read Next Story