फ्रिजचं बटण 24 तास सुरु ठेवावं का? तुम्हीदेखील ही चूक करत नाही ना?

घऱाची मुलभूत गरज

फ्रिज हा आजकाल प्रत्येक घऱाची मुलभूत गरज आहे. भाज्या, फळं यासह अनेक पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी फ्रीजमध्ये ठेवले जातात.

1 ते 2 तासांसाठी बंद

अनेक घरांमध्ये फ्रिज 24 तास सुरु असतो. तर काही घऱांमध्ये 1 ते 2 तासांसाठी बंद ठेवला जातो.

फ्रिज किती वेळ सुरु ठेवावा?

फ्रिजची निर्मिती करणाऱ्या कंपन्याही तो किती वेळ सुरु ठेवावा याची माहिती देत नाहीत. पण फ्रिज दिवसातून एक-दोन तासासाठी बंद ठेवण्याने फायदा होतो की नुकसान?

इलेक्ट्रॉनिक उपकरण

फ्रिज कूलिंग करणारं एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. त्यामुळे फ्रिज 24 तास सुरु ठेवला तरी त्यात काहीच समस्या नाही.

जर तुम्ही दिवसातून 1-2 तासासाठी किंवा अनेकदा बंद चालू केला तर तो योग्यप्रकारे कुलिंग करु शकणार नाही. ज्यामुळे आत ठेवलेले खाण्या, पिण्याचे पदार्थ खराब होऊ शकतात.

जर तुम्ही मोठ्या कालावधीसाठी घराबाहेर जात असाल तर फ्रिज बंद ठेवू शकता. पण जर 2-3 दिवसांसाठी जात असाल तर बंद कऱण्याची गरज नाही.

तसंच आजकाल फ्रिजमध्ये पॉवर सेटिंगसाठी ऑटोमॅटिक ऑफ किंवा ऑटोकट फिचर दिले जात आहेत. यामध्ये फ्रिज एका ठराविक तापमानार थंड झाल्यानंतर बंद होतो.

फ्रिज ऑटो कट झाल्यानंतर कंप्रेसर बंद होतो. अशाप्रकारे वीजेची बचत होते. यानंतर जेव्हा फ्रिजला कूलिंगची गरज असते तेव्हा तो आपोआप चालू होतो.

VIEW ALL

Read Next Story