लवकरच येणार भारतात

लवकरच अशी 'रिंग' भारतात येणार आहे जी क्रेडिट कार्डप्रमाणे काम करणार आहे.

आता पाकिटाची गरज नाही

कारण या 'रिंग'द्वारे तुम्ही स्वाइप करून कोणालाही पैसे देऊ शकणार आहात.

देशात कोणी बनवली ही रिंग?

केरळ स्टार्टअप मिशनच्या स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये ही स्मार्ट रिंग सादर करण्यात आली होती. तिरुअनंतपुरम आधारित स्टार्टअप एसेमनीने ती तयार केली आहे.

परदेशात वापरही सुरु

हीच 'अंगठी' McClear ने ब्रिटनमध्ये लॉन्च केली आहे. आता कंपनी तिच्या भागीदार Transcorp सोबत तिला भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

कोणत्या तंत्रज्ञानावर काम करते?

मॅक्लियरची रिंग RFID तंत्रज्ञानावर काम करते आणि रिंगवर तुमचा क्रेडिट किंवा डेबिट कार्ड डेटा मॅप करण्यासाठी स्मार्टफोनमधल्या अॅपचा वापर करते.

कशी दिसते स्मार्ट रिंग?

मॅक्लियर रिंग ही अगदी एखाद्या दागिन्यासारखी दिसते. तुम्ही तुमच्या कोणत्याही बोटात ती घालू शकता आणि पेमेंट करण्यासाठी वापरु शकता.

कशी काम करते?

POS युनिटवर तुमचे क्रेडिट कार्ड टॅप करण्याऐवजी, तुम्ही पेमेंट करण्यासाठी तुमच्या रिंगवर टॅप करायचे असते.

अंगठी हरवली तर काय?

तुमची अंगठी हरवल्यास, तुम्ही ती स्मार्टफोन अॅपवरून डिसेबल करू शकता.

फिचर्स काय आहेत?

ही अंगठी झिरकोनिया सिरॅमिकपासून बनवली आहे. हे हायपोअलर्जेनिक आहे. त्यामुळे या रिंगवर कोणतेही डाग येणार नाहीत.

अंगठीत पाणी गेलं तर काय?

जर अंगठी पाण्यात गेली तर काळजी करण्याचं कारण नाही. कारण ती वॉटरप्रूफ आहे. (सर्व फोटो - freepik.com)

VIEW ALL

Read Next Story