आता स्मार्टफोनची गरज नाही अंगठीने होणार Payment; पाहा फिचर्स, किंमत

स्मार्ट अंगठ्यांची लोकप्रियता

दिवसोंदिवस भारतामध्ये स्मार्ट रिंगची म्हणजेच स्मार्ट अंगठ्यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे.

अनेक कंपन्यांच्या अंगठ्या बाजारात

नॉइज आणि बोटने आपल्या स्मार्ट रिंग बाजारात आणल्या आहेत.

इतरांपेक्षा वेगळी स्मार्ट अंगठी

आता आयआयटी मद्रासमधून सुरु झालेल्या एका स्टार्टअप कंपनीनेही स्मार्ट अंगठी तयार केली आहे. मात्र ही रिंग इतर स्मार्ट रिंगपेक्षा वेगळी आहे.

आरोग्यासंदर्भातील माहिती ट्रॅक करतात

इतर स्मार्ट अंगठ्या या आरोग्य, झोपण्यासंदर्भातील आणि तब्बेतीसंदर्भातील गोष्टींचं ट्रॅकिंग करतात.

डिजीटल पेमेंट करता येणार

मात्र रिंग वन नावाची ही अंगठी वापरुन डिजीटल पेमेंटही करता येणार आहे.

कोणी तयार केलीय ही स्मार्ट अंगठी?

ही स्मार्ट रिंग Muse कंपनीने तयार केली आहे. आपण वेरेबल स्मार्ट टेक्नोलॉजीमध्ये बरेच बदल करु असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

भारतामधील निर्मात्यांकडूनच बनवून घेतात

Muse कंपनी त्यांची स्मार्ट अंगठी आणि स्मार्टवॉच भारतामधील स्थानिक निर्मात्यांकडूनच तयार केली जाते. त्यामुळे हा पूर्णपणे मेकइन इंडिया प्रोडक्ट आहे.

प्रोडक्शन सुरु

कंपनीने आपल्या रिंग वन नावाच्या अंगठीचं मोठ्याप्रमाणात प्रोडक्शन सुरु केलं आहे. ही अंगठी 27 सप्टेंबर रोजी बाजारात लॉन्च केली जाईल.

भारतात कधी लॉन्च करणार?

भारतामध्ये ही अंगठी 25 ऑक्टोबर रोजी लॉन्च केली जाणार आहे.

30 टक्के सवलत

ही अंगठी वेबसाईटवर जाऊन प्री-रिझर्व्ह करता येणार आहे. प्री-बूक करणाऱ्यांना 30 टक्के सवलत दिली जाईल असं कंपनीने सांगितलं आहे.

4 सेकंदांमध्ये पेमेंट

रिंग वनच्या माध्यमातून अवघ्या 4 सेकंदांमध्ये पेमेंट करता येणार आहे. फिटनेस ट्रॅकिंगसाठी ही रिंग वापरता येईल.

किंमत किती?

रिंग वनची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र बोटची रिंग 8999 रुपयांना असल्याने वन रिंगची किंमत 10 हजारांहून कमी असेल असं मानलं जात आहे.

VIEW ALL

Read Next Story