Tata ने लाँच केली नवी सायकल; जबरदस्त फिचर्स, किंमत इतकी की स्मार्टफोन परवडेल

Contino Noisy Boy

टाटा इंटरनॅशनलची सहकारी कंपनी स्ट्रायडर सायकल्सने घरगुती बाजारात आपली नवी सायकल Contino Noisy Boy ला लाँच केलं आहे.

सर्व रस्त्यांसाठी अनुकूल

ही सायकल कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर धावू शकते अशाप्रकारे तयार करण्यात आल्याचा दावा आहे. नवे आणि प्रोफेशनल एथलिट दोघेही वापरु शकतात अशाप्रकारे ही सायकल डिझाईन करण्यात आली आहे.

सायकल लाँच करताना स्ट्राइडर सायकलचे बिझनेस हेड राहुल गुप्ता म्हणाले की, ही चांगली वेळ आहे कारण भारतात बीएमएक्स रायडिंग वेग पकडत आहे.

अत्याधुनिक साहित्य आणि तंत्रज्ञानाचा वापर

ही सायकल तयार करताना प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अत्याधुनिक साहित्य आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचंही ते म्हणाले आहेत.

BMX हा सायकल स्पोर्ट

BMX हा एक सायकल स्पोर्ट आहे, ज्याला बायसिकल मोटोक्रॉसही म्हटलं जातं. यामध्ये खास प्रकारच्या सायकलचा वापर केला जातो.

360 डिग्री फ्री स्टाइल रोटर

या सायकललाही BMX रायडिंगसाठी तयार करण्यात आलं आहे. यामध्ये U ब्रेक्ससह 360 डिग्री फ्री स्टाइल रोटर दिले आहेत.

ठराविक काळासाठी ऑफर

कंपनी या सायकलसह ठराविक काळासाठी ऑफरही देत आहे. यासह 4335 रुपयांचा डिस्काऊंट आणि 3500 रुपयांचं कॉम्पिमेंटरी गिफ्टही देत आहे.

20 इंचाचा नॉयलॉन टायर

Stryder च्या नव्या सायकलमध्ये कंपनीने 20 इंचाच्या नॉयलॉन टायरचा वापर केला आहे. ही सायकल वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असून, कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करु शकता.

किंमत किती?

या सायकलची उंची 4 फूट असून 10 पेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी चांगली आहे. ही सायकल 80 किलोपर्यंतचं वजन झेपू शकते. कंपनी सायकलवर 2 वर्षांची वॉरंटी देत आहे. या अँडव्हेंचर स्टाइल बाईकची किंमत 12,995 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story