देशाची प्रमुख वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपली सर्वात लोकप्रिय एसयुव्ही Harrier आणि Safari च्या पेट्रोल व्हर्जनला लाँच करत आहे.
दोन्ही मॉडेल आतापर्यंत फक्त डिझेलमध्ये उपलब्ध होते. पण आगामी काळात एक नवी, ज्यादा रिफाइंड आणि अॅडव्हान्स पेट्रोल इंजिन दिलं जाणार आहे.
1.5 लीटर, 4 सिलेंडर डायरेक्ट इंजेक्शन टर्बो-पेट्रोल इंजिन टाटाच्या Hyperion इंजिन सीरिजचा भाग आहे.
कंपनी मागील 5 वर्षांपासून या पॉवरट्रेनवर काम करत होती. पहिल्यांदा 2023 मध्ये ऑटो एक्स्पोत ती सादर करण्यात आली.
आता मोठ्या प्रतिक्षेनंतर 9 डिसेंबर 2025 ला Tata Harrier आणि Safari पेट्रोल भारतात लाँच होणार आहे.
या इंजिनमध्ये 5000 आरपीएमवर 170 बीएचपीची पॉवर आणि 2000 ते 3500 आरपीएमदरम्यान 280Nm चा टॉर्क जनरेट करेल.
टाटाचं नवं इंजिन पूर्णपणे भारतीय रस्त्यांनुसार डेव्हलप करण्यात आलं आहे. कंपनी त्याला मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक गेअरबॉक्स दोन्ही पर्यायात सादर करणार आहे.
सध्या Harrier ची किंमत 14 लाखांपासून ते 25.25 लाख आणि Safari ची किंमत 14.66 लाखांपासून ते 25.96 लाख आहे.
किंमतीबद्दल बोलायचं गेल्यास Tata Harrier आणि Safari चं पेट्रोल व्हेरियंट डिझेलच्या तुलनेत स्वस्त असेल.