फोनची बॅटरी कमी होऊ लागते

जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा आपल्या फोनची बॅटरी सामान्य दरापेक्षा थोड्या वेगाने कमी होऊ लागते.

असे का घडते?

पण असे का घडते याचा विचार केला आहे का? या मागचे कारण जाणून घेऊया. फोनमध्ये एक अँटेना असतो जो नेटवर्क सेवा प्रदात्याच्या टॉवरशी सतत जोडण्याचा प्रयत्न करत असतो.

प्रवासात नेटवर्क टॉवरच्या शोधात

चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी तो नेहमी जवळचे टॉवर शोधत असतो. तो टॉवरशी जोडला जाते जिथून त्याला चांगला सिग्नल मिळतो.

नवीन टॉवर्सशी जोडला जातो मोबाईल

प्रवास करताना, नेटवर्क टॉवर्स सतत बदलत राहतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना ते तेथील टॉवरशी जोडले जाते.

म्हणून लवकर संपते बॅटरी

या प्रक्रियेत बॅटरीचा जास्त वापर होतो आणि त्यामुळे बॅटरी लवकर संपू लागते.

कशी वाचवाल बॅटरी?

प्रवासादरम्यान तुम्हाला बॅटरी वाचवायची असेल, तर सर्वोत्तम मार्ग फोनला फ्लाइट मोडमध्ये टाका. तुम्हाला तिथे जायचंय तिथे पोहोचल्यावर फ्लाइट मोडमधून काढून टाका.

VIEW ALL

Read Next Story