पंखा एक ते पाच या वेगाने धावतो. यामध्ये, तो क्रमांक एकवर सर्वात कमी आणि पाचव्या क्रमांकावर सर्वात वेगवान फिरतो. त्यामुळे लोकांना वाटतं की यामुळे विजबिलात फरक पडतो.
पण हे हे पंख्याच्या रेग्युलेटरच्या प्रकारावर अवलंबून असते. जर तुमचा रेग्युलेटर इलेक्ट्रिक रेग्युलेटर असेल तर तो फायरिंग अँगल बदलून करंटचा प्रवाह नियंत्रित करतो. यामुळे विजे खर्च वाचतो.
तर जुने रेग्युलेटर फॅनला दिलेला व्होल्टेज कमी करून त्याचा वेग कमी करत असत. पण, यामुळे विजेची बचत होत नाही. कारण हे रेग्युलेटर रेझिस्टर म्हणून काम करते आणि त्यात तेवढीच वीज वाया जाते.