व्हिडिओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर सध्या पोलिसांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पोलिसाने मोबाईल वापरकर्त्यांना एक इशारा दिला आहे.

Jun 29,2023

पोलिसांनी दिला इशारा

या व्हिडिओत पोलीस Any Desk App पासून सावध राहाण्याच्या सुचना करत आहेत.

टोळीचा केला पर्दाफाश

पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून काही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

अशी केली जाते फसवणूक

या टोळीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांचा व्हिडिओ बनवला आणि ती टोळी कशी फसवणूक करते याबाबत माहिती दिली.

एनी डेस्क अॅप धोकादायक

या व्हिडिओत पोलीस एनी डेस्क अॅप किती धोकादायक आहे, याची माहिती देतायत.

नियंत्रण दुसऱ्याच्या हातात

एनी डेस्क अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्या माध्यमातून आपल्या मोबाईलचा एक्सेस दूर बसलेल्या व्यक्तीच्या हातात जाऊ शकतो.

गोपनीय माहितीची चोरी

या अॅपच्या माध्यमातून तो व्यक्ती तुमच्या मोबाईलमधली गोपनीय माहिती सहजरित्या चोरू शकतो.

गैरवापही होऊ शकतो

तुमच्या मोबाईलमधील UPI किंवा OTP देखील तो चोरून त्याचा गैरवापर करु शकतो.

अकाऊंट होऊ शकतं रिकामं

स्कॅमर्स अशा अॅपच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाऊंटमधील पैसेही लंपास केले जाऊ शकतात.

लॅपटॉप, कॉम्प्यूटरचाही एक्सेस

एनी डेस्क अॅपच्या माध्यमातून मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्यूटरचा एक्सेसही मिळवला जाऊ शकतो.

फोन होऊ शकतो हॅक

या अॅपचा वापर कस्टमर सपोर्टसाठी वापर केला जातो. पण स्कॅमर्सकडून या अॅपचा वापर लोकांचे फोन हॅक करण्यासाठी वापरला जातोय.

VIEW ALL

Read Next Story