WhatsApp ला टक्कर देण्यासाठी एलॉन मस्क यांनी ट्विटर म्हणजे आताचं X वर नव्या फिचरची घोषणा केली आहे. सध्या याची चाचणी केली जात असून लवकरच ते युजर्सच्या भेटीला येणार आहे.

Aug 31,2023


एलॉन मस्क यांनी मीडिय प्लॅटफॉर्म X वर या फिचर्सची माहिती दिली आहे. X वर लवकरच ऑडियो आणि व्हिडिओ कॉलिंगचं फिचर येणार असल्याची घोषणा त्यांनी केली


हे फिचर iOS, Android, Mac आणि पीसी या सर्व डिव्हाईसवर काम करेल. विशेष म्हणजे यासाठी युजर्सना कोणत्याही फोन नंबरची गरज भासणार नाही


एलॉन यांच्या मते या फिचरनंतर X एक ग्लोबल अॅड्रेस बूक म्हणून नावारुपाला येईल. हे फिचर साधारण फेसबूक आणि इन्स्टाग्रामवरच्या कॉलिंगसारखच काम करतं.


फेसबूक मॅसेंजर आणि इन्स्टाग्रामवरही कॉल करण्यासाठी फोन नंबरची गरज भासत नाही. पण यासाठी काही अटीशर्थीही असतात.


फेसबुक आणि इंस्टाग्राम कॉलिंगवरुन डेस्कटॉपवर क़ल करत येत नाही. पण X वरच्या फिचरवरुन कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर कॉल करता येणार आहे.


पण हे X चं फिचर सर्व युजर्सना वापरता येणार नाही. कंपनी हे फिचर वेरिफाईड युजर्ससाठी लाँच करणार आहे. म्हणजे सब्सक्रिप्शन विकत घेणाऱ्या युजर्सनाच X वरुन कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.


या फिचरबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. म्हणजे एकमेकांना फॉलो करणारेच हे फिचर वापरु शकतात की कोणालाही फोन करता येऊ शकतो, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

VIEW ALL

Read Next Story