5 स्टार सेफ्टी, जबरदस्त परफॉर्मन्स! Volkswagen ने लाँच केली दमदार SUV

Nov 02,2023

Taigun चं नवं एडिशन लाँच

फेस्टिव्ह सीझन असल्याने अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या प्रसिद्ध मॉडेलंच स्पेशल एडिशन लाँच करत आहेत. त्यातच फॉक्सवॅगनने इंडियाने Taigun चं एक नवं एडिशन लाँच केलं आहे.

किंमत किती?

Volkswagen ने या कारला Taigun GT Edge Trail Edition असं नाव दिलं आहे. या कारची सुरुवातीची किंमत 16 लाख 3 हजार ठेवण्यात आली आहे. हे एक लिमिटेड एडिशन असून मर्यादित संख्येत वाहनांची विक्री केली जाणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

स्पेशल एडिशनमध्ये कॉस्मेटिक बदल

स्टँडर्ड Taigun च्या तुलनेत नव्या स्पेशल एडिशनमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. टेलगेटवर Trail ची एक बैजिंग देण्यात आली आहे, जी त्याला रेग्यूलर मॉडेलपेक्षा वेगळी ठरवते.

स्पेशल अलॉय व्हील

याशिवाय रेअर फेंडर्स, दरवाजे, सी पिलर्स, रुफ रेलवर स्पेशल ट्रिटमेंट पाहण्यास मिळते. कंपनीने कारमध्ये स्पेशल अलॉय व्हील दिलं आहे आणि ब्रेक कॅलिपर्सला रेड कलर फिनिश दिलं आहे.

विशेष रंग

कंपनीने या एसयुव्हीला विशेष रंगात सादर केलं आहे. ज्यामध्ये कार्बन स्टील ग्रे, रेलफ्लेक्स सिल्व्हर आणि कँड व्हाइट रंग आहेत.

1.5 लीटर क्षमतेचं टर्बो पेट्रोल इंजिन

या लिमिटेड एडिशनमध्ये 1.5 लीटर क्षमतेच्या टर्बो पेट्रोल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. जो 150 बीएचपी पॉवर जनरेट करतं. याला 6 स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन गेअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे.

वायरलेस फोन चार्जिंग

कारमध्ये 10 इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. यामध्ये वायरलेस फोन चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.

इतर फिचर्स

याशिवाय ऑटोमॅटिक हेडलँप, रियर कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि डॅशकॅमेरासारख्या सुविधा मिळतात. डॅशकॅमचं रेकॉर्डिंग पाहण्यासाठी 2 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.

5 स्टार सेफ्टी रेटिंग

Volkswagen Taigun देशातील सर्वात सुरक्षित वाहनांपैकी एक आहे. नुकतंच ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये तिला 5 स्टार रेटिंग मिळाली आहे.

VIEW ALL

Read Next Story