उकाडा वाढू लागला की घराघरात एसीचा वापरही वाढतो. घरातच काय, तर अगदी चारचाकी वाहनांमध्येसुद्धा फुल्ल स्पीडमध्ये एसी चालवला जातो.
कारमधील एसीच्या बाबतील लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे इथं एसी कमी-जास्त केल्यानं त्याचा थेट परिणाम कारच्या मायलेजवर पडतो.
कारचा एसी पूर्णपणे कारच्या इंजिनशी जोडलेला असतो. ज्यामुळं एसीच्या वापराचा परिणाम मायलेजवर दिसून येतो. कारण एसी सुरू झाल्यास लगेचच इंजिनवरील भार वाढतो.
एसी कंप्रेसरमुळं ही क्रिया होते जिथं एसी इंजिनमधून मिळणाऱ्या उर्जेमुळं सुरू राहतो.
एसीचा फॅन कारची बॅटरी आणि इलेक्ट्रीकल सिस्टीमशी जोडलेला असतो. हवा कार केबिनमध्ये पाठवण्याचच काम हा फॅन करतो.
एसी फॅनला कारच्या बॅटरीतून उर्जा मिळते त्यामुळं त्याचा मायलेजवर परिणाम होत नाही. लक्षात घ्या एसी 1 वर सुरू ठेवा किंवा 4 वर इंधन तितकंच वापरलं जातं.
कारमध्ये चांगली कुलिंग करण्यासाठी सुरुवातीला एसी कायम मीडियम स्पीडमध्ये ठेवा. उन्हात कार उभी असल्यास एसी सुरू करण्याआधी कारच्या काचा हलक्या उघड्या ठेवा.