एअरक्राफ्ट, जहाजांच्या उत्पादनानंतर BMW कार उत्पादन क्षेत्रात सक्रिय झाली. सध्याच्या घडीला ही कंपनी लक्झरी कार्सच्या जगतात भलतीच प्रसिद्ध आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या विश्वयुद्धात म्हणजेच अनुक्रमे 1917- 18 आणि 1933 - 45 दरम्यान एअरक्राफ्ट डिझायनिंगचं काम केलं होतं.
1916 मध्ये जर्मनीमध्ये या कार कंपनीची स्थापना करण्यात आली होती. यापूर्वी कंपनी एअरक्राफ्ट निर्मितीमध्ये नावारुपास आली होती.
अनेकांनाच या कार कंपनीच्या नावाचा उच्चार सहजासहजी करता येत नाही, त्यामुळं मग जगभरात तिला उल्लेख BMW म्हणूनच केला जातो.
जर्मन भाषेत या ब्रँडचा उच्चार करायचा झाल्यास, 'ब्रेयिस्च मोटरेन वर्के' असा उल्लेख केला जातो. एकदा करून पाहा, पहिल्या वेळी हे पूर्ण नाव उच्चारणं कठीणच वाटेल.
BMW मधील पहिलं अक्षर हे एका ठिकाणाचं नाव आहे. सुरुवातीला कंपनीकडून इंजिन निर्मिती केली जात होती. त्यामुळं या नावाच 'मोटार' चा उल्लेख आहे.
बवेरियन मोटर वर्क्स असं या कार कंपनीचं फुलफॉर्म आहे. ही एक जर्मन कार उत्पादक कंपनी असून, त्याची सुरुवात जर्मनीतील बवेरिया येथे झाली होती.
या कार कंपनीचं फुलफॉर्म इतकं किचकट आहे, की पहिल्या झटक्यात बोलताना तुमचीही बोबडी वळेल.
भारतातच नव्हे, तर जगभरातून BMW कारच्या विविध मॉडेल्सना पसंती दिली जाते. पण, आजही अनेकांनाच या ब्रँडचं Full Form ठाऊक नाही
BMW चं फुलफॉर्म माहितीये? एका श्वासात बोलताना बोबडीच वळेल