देशभरातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तापमानात घट झाली आहे. पण काही ठिकाणी अद्यापही गर्मीचा सामना करावा लागत आहे.

उकाडा असह्य होऊ लागला की साहजिकपणे हात एसी रिमोटकडे वळतात. अशावेळी अनेकाना पावसात AC चं तापमान किती असावं हे समजत नाही.

पावसात एसीचं तापमान 26 ते 28 दरम्यान ठेवावं. पण जर तुमचा एसी जुना असेल तर तो उशिरा कूल होतो त्यामुळे तुमच्या गरजेप्रमाणे तापमान ठेवा.

तुम्ही हवं तर स्लीप मोडचाही वापर करु शकता. जवळपास सर्व एसींमध्ये हे फिचर असतं. या फिचरमध्ये एसीचं तापमान हळूहळू वाढतं.

पावसाळ्यात एसीवर नकारात्मक प्रभाव पडत नाही, मात्र तरीही आपण काही गोष्टींची काळजी घ्यावी.

जर पावसाळ्यात वादळ किंवा वेगाने वारे वाहत असतील तर एकदा एसी तपासून घ्या. अनेकदा आऊटर युनिटची तार ढिली होते.

पावसाळ्यातही नियमितपणे एसी फिल्टरची स्वच्छता करायला हवी. फिल्टर स्वच्छ न केल्यास कुलिंग क्षमता कमी होते.

पावसाळ्यात एसी वापरण्याची सर्वात योग्य पद्धत म्हणजे Monsoon Mode किंवा Rain Mode चा पर्याय निवडणं.

पावसाळ्यात एसी सुरक्षित ठेवण्यासाठी नियमितपणे त्याची सर्व्हिसिंग करा. अन्यथा तो खराब होऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story